मराठी बातम्या  /  बिझनेस  /  LIC Dividend : एलआयसीला ५ पट नफा, विमा कंपनीने केली लाभांशाची घोषणा, असा होणार फायदा

LIC Dividend : एलआयसीला ५ पट नफा, विमा कंपनीने केली लाभांशाची घोषणा, असा होणार फायदा

May 25, 2023, 11:41 PM IST

    • LIC Dividend : एलआयसीचा नफा ५ पटीने वाढला आहे. कंपनीला मार्च २०२३ च्या तिमाहीत १३४२७.८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षातील समान कालावधीच्या तुलनेत त्यात ४६६ टक्क्यांची वाढ झाली आहे.
LIC HT

LIC Dividend : एलआयसीचा नफा ५ पटीने वाढला आहे. कंपनीला मार्च २०२३ च्या तिमाहीत १३४२७.८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षातील समान कालावधीच्या तुलनेत त्यात ४६६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

    • LIC Dividend : एलआयसीचा नफा ५ पटीने वाढला आहे. कंपनीला मार्च २०२३ च्या तिमाहीत १३४२७.८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षातील समान कालावधीच्या तुलनेत त्यात ४६६ टक्क्यांची वाढ झाली आहे.

LIC Dividend : सरकारी विमा कंपनी एलआयसीचा नफा ५ पटीपेक्षा जास्त वाढला आहे. विमा कंपनीला जानेवारी ते मार्च २०२३ तिमाहीत १३४२७.८कोटींचा स्टँडअलोन निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याच्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा नफा ४६६ टक्के वाढला आहे. एलआयसीला गेल्या वर्षी मार्च तिमाहीत २३७१.५ कोटी रुपयांचा नफा झाला होता. विमा कंपनीचे शेअर्स गुरुवारी बीएसईवर अंदाजे ३ टक्के तेजीसह ६१३.६५ रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

China Gold Purchase : सोनं महाग होण्यामागे चीनचा हात, नेमकं काय करतोय चिनी ड्रॅगन

Amazon Summer Sale: कडक उन्हाळ्यात थंड हवेचा आनंद; एसीच्या खरेदीवर अ‍ॅमेझॉन देतोय ५५ टक्के सूट!

NBFC FD Rates : 'या' पाच वित्तीय कंपन्या एफडीवर देतायत ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या सविस्तर

Business Ideas : कर्ज हे नेहमीच वाईट नसतं; 'मसाला किंग' धनंजय दातार सांगतायत स्वानुभव

प्रति शेअर्स ३० टक्के लाभांश

एलआयसीने प्रति शेअर्स ३० टक्के लाभांश देण्याची घोषणा केली आहे. याचाच अर्थ विमा कंपनी २०२२-२३ साठी प्रति शेअर्स ३ रुपये लाभांश देणार आहे. कंपनी लाभांश पेमेंट्सवर १८९७ कोटी रुपये खर्च करणार आहे. एलआयसीने सांगितले की, त्यांनी मार्च २०२३ च्या तिमाही दरम्यान आपल्या नाॅन पार्टिसिपेटिंग फंडाद्वारे शेअर होल्डर फंडमध्ये ७२९९ कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. एलआयसीने वित्त वर्ष २०२२-२३ च्या शेवटच्या तिमाहीत ८४२८.५ कोटी रुपयांचे नेट कमिशन कमावले आहे. गेल्या वर्षी समान तिमाहीत ते अंदाजे ५.४ टक्के जास्त आहे.

शेअर्समध्येही वाढ

कंपनीचे तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शेअर्सवरही याचा चांगला परिणाम दिसून आला. गुरुवारी शेअर बाजाराचं कामकाज सुरू झाल्यानंतर एलआयसीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली होती. व्यवहारादरम्यान एलआयसीचे शेअर्स १.६० टक्क्यांच्या वाढीसह ६०३.१५ रुपयांवर पोहोचले होते. कंपनीच्या लिस्टिंगपासूनच शेअर्समध्ये घसरण कायम आहे. यामुळे कंपनीच्या बाजार भांडवलात वर्षभरात २ लाख कोटीची घसरण झाली आहे.

विभाग