मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Pump : जीपे, फोन पे ला तूर्त विराम, पेट्रोल पंपावर लोकं मुद्दाम देतायेत २००० च्या नोटा !

Petrol Pump : जीपे, फोन पे ला तूर्त विराम, पेट्रोल पंपावर लोकं मुद्दाम देतायेत २००० च्या नोटा !

May 23, 2023, 09:36 AM IST

    • Petrol Pump : २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर पेट्रोल पंपावरील रोखीचे व्यवहार ९० टक्क्यांनी वाढले आहेत. १०० ते २०० रुपयांचे पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी ग्राहक २००० रुपयांच्या नोटा देत आहेत.
petrol pump 2000 notes HT

Petrol Pump : २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर पेट्रोल पंपावरील रोखीचे व्यवहार ९० टक्क्यांनी वाढले आहेत. १०० ते २०० रुपयांचे पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी ग्राहक २००० रुपयांच्या नोटा देत आहेत.

    • Petrol Pump : २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर पेट्रोल पंपावरील रोखीचे व्यवहार ९० टक्क्यांनी वाढले आहेत. १०० ते २०० रुपयांचे पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी ग्राहक २००० रुपयांच्या नोटा देत आहेत.

Petrol Pump : आरबीआयने २००० रुपयांची नोट काढून घेण्याच्या निर्णयानंतर पेट्रोल पंपांवर रोखीच्या व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन (एआयपीडीए) ने म्हटले आहे की, पेट्रोल पंपांवर रोखीचे व्यवहार ९० टक्क्यांनी वाढले आहेत. यामुळे लोक जीपे, फोन पे यासारख्या डिजीटल पेमेंटपेक्षा रोख रक्कमद्वारे पेमेंट करणारे ग्राहक दहापैकी नऊ प्रकरणांमध्ये २००० रुपयांच्या नोटा वापरत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Redmi 13 C 5G: शाओमीचा 5G स्मार्टफोन झाला स्वस्त, १० हजारांत मिळतोय दमदार कॅमेरा

Investors kyc : केवायसी पूर्ण न केल्यानं सव्वा कोटी गुंतवणूकदारांची खाती ठप्प, तुमचं खातं तर यात नाही ना?

LPG Gas cylinder price : निवडणूक सुरू असतानाच व्यावसायिक गॅस सिलिंडर झाला स्वस्त; तुमच्या शहरात दर किती?

Sriniva pallia : विप्रोचे नवे सीईओ श्रीनिवास पल्लिया यांचं सॅलरी पॅकेज किती? पगाराबरोबर आणखी काय-काय मिळणार?

ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने सांगितले की, २००० रुपयांची नोट मागे घेण्याच्या आरबीआयच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा देशभरातील पेट्रोल पंपांवर २०१६ च्या नोटाबंदीच्या वेळी तशीच कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. १००-२०० रुपयांच्या छोट्या रकमेच्या पेट्रोल डिझेलच्या खरेदीसाठीही ग्राहक २००० रुपयांच्या नोटा देत आहेत.

"पूर्वी आम्हाला रोजच्या रोखीतील व्यवहारांमध्ये फक्त १०% रक्कम मिळत होती, परंतु आता आमच्या आउटलेटवर मिळणाऱ्या जवळपास ९०% रोख फक्त २००० रुपयांच्या नोटांच्या रूपात मिळत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर जमा होणाऱ्या २००० च्या नोटा बँकांमध्ये जमा कराव्या लागतील ही अडचण ठरणार आहे.

असोसिएशनने म्हटले आहे की पेट्रोल पंपावरील दैनंदिन विक्रीतील ४०% वाटा असलेले डिजिटल पेमेंटचे प्रमाण १०% पर्यंत खाली आले आहे. तर रोख विक्री वाढली आहे. ही संपूर्ण डिलर्ससाठी डोकेदुखी ठरत आहे. २०१६ मध्ये झालेल्या नोटबंदीनंतर उद्भवलेल्या समस्यांची ही पूनरावृत्ती ठरु शकते. कारण २०१६ नंतर बहुतांश डिलर्सना आयकराच्या नोटिसा, छापेमारी यांना कोणताही दोष नसताना सामोरे जावे लागले होते.

पेट्रोल पंप डीलर्सना कमी मूल्याच्या नोटा पुरेशा प्रमाणात पुरवण्यासाठी बँकांना सुचना द्याव्यात. जेणेकरुन ते इंधन भरणाऱ्या ग्राहकांना मुबलक प्रमाणात सुट्टे पैसे देऊ शकतील, अशी विनंती असोसिएशनने रिझर्व्ह बँकेला केली आहे. दरम्यान, ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन ही देशातील पेट्रोल पंप डीलर्सची सर्वात मोठी संघटना आहे.

विभाग