मराठी बातम्या  /  बिझनेस  /  2000 notes exchange : बँकेतून २००० रुपयांची नोट बदलण्याची प्रक्रिया आजपासून सुरु, 'या' गोष्टींची घ्या काळजी

2000 notes exchange : बँकेतून २००० रुपयांची नोट बदलण्याची प्रक्रिया आजपासून सुरु, 'या' गोष्टींची घ्या काळजी

May 23, 2023, 08:26 AM IST

    • 2000 notes exchange : २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत २००० रुपयाची नोट चलनात वापरता येणार आहे. या चार महिन्यांच्या कालावधीत चलनात घेण्यासाठी कोणीही नकार देऊ शकत नाही.
2000 notes HT

2000 notes exchange : २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत २००० रुपयाची नोट चलनात वापरता येणार आहे. या चार महिन्यांच्या कालावधीत चलनात घेण्यासाठी कोणीही नकार देऊ शकत नाही.

    • 2000 notes exchange : २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत २००० रुपयाची नोट चलनात वापरता येणार आहे. या चार महिन्यांच्या कालावधीत चलनात घेण्यासाठी कोणीही नकार देऊ शकत नाही.

२००० notes exchange : २००० रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत २००० रुपयाची नोट चलनात वापरता येणार आहे. कोणत्याही बँकेत जाऊन तुम्हाला २००० रुपयांची नोट बदलता येणार आहे. एकावेळी किमान १० नोटा बदलता येतील. म्हणजेच एकाचवेळी याचे मूल्य २० हजार रुपये आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

आरबीआयने नोटा बदलण्यासाठी ४ महिन्यांचा कालावधी दिला आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वानुसार, २३ मे ते ३० सप्टेंबर दरम्यान २००० रुपयांच्या नोटा बँकेत जाऊन बदलता येतील अथवा बँक खात्यात जमा करता येतील. ज्या लोकांकडे स्वत ;चे बँक खाते नाही, असे लोकंही या २००० रुपयांच्या नोटा बँकेत जमा करु शकतात.

क्लीन नोट पाॅलिसीचा भाग

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी सोमवारी मिडियाला सांगितले की, २००० रुपयांची नोट बंद करणे हा क्लीन नोट पाॅलिसीचा भाग आहे. जो चलन व्यवस्थापनाच्या अंतर्गत येतो. देशातील नागरिकांना नोटबदलीसाठी ४ महिन्याची मुदत देण्यात आली आहे. हा कालावधी पुरेसा आहे. नोट बदल करण्यासाठी ग्राहकांनी कोणत्याही प्रकारे घाई करु नये, असेही त्यांनी सांगितले.

बाजारात २०१६ च्या नोटबंदीच्या काळात २००० रुपयाच्या नोटा चलनात आणल्या होत्या. पण आता चलनातील त्याचा हेतू पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता बाजारातून या नोटा काढून घेण्यात येत असल्याचे दास यांनी स्पष्ट केले. सध्या बाजारात इतर ५००, १००० रुपयाच्या मुबलक नोटा आहेत. त्यामुळे ग्राहकांनी चिंता करु नये. रिझर्व्ह बँक तुमच्या समस्येचे निराकरण करण्यास तत्पर असल्याचेही गव्हर्नरांनी सांगितले.

विभाग

पुढील बातम्या