मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Shaktikanta das on 2000 noteban : २००० रुपयांच्या नोटबंदीसाठी डेडलाईन का महत्त्वाची? RBI गव्हर्नर म्हणाले…

Shaktikanta das on 2000 noteban : २००० रुपयांच्या नोटबंदीसाठी डेडलाईन का महत्त्वाची? RBI गव्हर्नर म्हणाले…

May 22, 2023, 01:43 PM IST

    • Shaktikanta das on 2000 noteban : २००० रुपयांच्या नोटबंदीसंदर्भात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शक्तिकांता दास म्हणाले, नोटबंदीच्या काळानंतर रोखीची टंचाई भरुन काढण्यासाठी २००० रुपयांची नोट आणण्यात आली.
Shaktikant das, RBI governor HT

Shaktikanta das on 2000 noteban : २००० रुपयांच्या नोटबंदीसंदर्भात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शक्तिकांता दास म्हणाले, नोटबंदीच्या काळानंतर रोखीची टंचाई भरुन काढण्यासाठी २००० रुपयांची नोट आणण्यात आली.

    • Shaktikanta das on 2000 noteban : २००० रुपयांच्या नोटबंदीसंदर्भात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शक्तिकांता दास म्हणाले, नोटबंदीच्या काळानंतर रोखीची टंचाई भरुन काढण्यासाठी २००० रुपयांची नोट आणण्यात आली.

Skaktikanta das on 2000 noteban : रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या नोटबंदीसाठी ३० सप्टेंबर ही डेडलाईन निश्चित केली आहे. या तारखेपूर्वी नागरिकांनी २००० रुपयांच्या नोटा परत बँकेत जमा करण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी सांगितले की, जेंव्हापर्यंत एखादी डेडलाईन दिली जात नाही तोपर्यंत कोणतीही प्रक्रिया अंतिम रुपपर्यंत पोहोचत नाही. कारण तोपर्यंत लोक ही बाब गंभीरतेने घेत नाहीत. लोकांच्या समस्या दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नोटबंदीनंतर रोखीच्या कमतरता भरुन काढण्यासाठी २००० रुपयांच्या नोट आणण्यात आली होती. ही नोट परत घेण्याचा निर्णय हादेखील चलन व्यवस्थापनाचा भाग आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

दास यांनी बँकांकडे २००० रुपयांची नोट बदलण्यासाठी जरुरी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत जास्तीत जास्त २००० रुपयांच्या नोटा परत घेतल्या जातील. आरबीआय गव्हर्नर श्कतिकांता दास यांनी सांगितले की, दुकानदार पहिल्यांदा २००० रुपयांची नोट घेण्यास हरकत घेत होते. आता त्यात कदाचित आणखीन वाढ होईल.

२००० रुपयांची नोट परत घेण्याचे आदेश दिले असले तरी ग्राहकांनी बँकांबाहेर मोठी रांग लावू नये असेही त्यांनी स्पष्ट केले. दुकानदारांनीही या नोटा घेण्यास नकार देऊ नये. त्यांनी बँकांनीही ग्राहकांना याबदल्यात जून्या फाटक्या नोटा देऊ नयेत असेही दास यांनी निर्देश दिले आहेत. एच वन बी व्हिसाधारकांसह एनआरआयनाही यासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरं जावं लागणार नााही.

विभाग

पुढील बातम्या