मराठी बातम्या  /  बिझनेस  /  2000 rupees note ban : गुलाबी रंगाच्या २००० रुपयांच्या नोटा परत घेतल्यावर RBI नेमकं काय करणार? जाणून घ्या

2000 rupees note ban : गुलाबी रंगाच्या २००० रुपयांच्या नोटा परत घेतल्यावर RBI नेमकं काय करणार? जाणून घ्या

May 22, 2023, 03:25 PM IST

    •  2000 rupees note ban : तुम्ही बँकेत जाऊन दोन हजार रुपयांच्या नोटा बदलू शकतात. लोकांकडे २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. जमा झालेल्या नोटा आरबीआयकडे पाठवल्या जातील. पण त्यानंतर या नोटांचं काय केलं जाईल, हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
RBI 2000 rupees notes HT

2000 rupees note ban : तुम्ही बँकेत जाऊन दोन हजार रुपयांच्या नोटा बदलू शकतात. लोकांकडे २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. जमा झालेल्या नोटा आरबीआयकडे पाठवल्या जातील. पण त्यानंतर या नोटांचं काय केलं जाईल, हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

    •  2000 rupees note ban : तुम्ही बँकेत जाऊन दोन हजार रुपयांच्या नोटा बदलू शकतात. लोकांकडे २००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. जमा झालेल्या नोटा आरबीआयकडे पाठवल्या जातील. पण त्यानंतर या नोटांचं काय केलं जाईल, हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

2000 rupees note ban : बँकेतील दोन हजार रुपयांच्या नोटा आता चलनातून बाहेर पडल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी ही बाब जाहीर केली.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकेत जाऊन बदलून घेऊ शकतात. मात्र, एकावेळी केवळ २० हजार रुपयांचीच देवाणघेवाण करता येते. या वेळेपर्यंत तुम्ही या नोटांच्या सहाय्याने बाजारात खरेदी-विक्री करू शकतात. दोन हजार रुपयांची गुलाबी नोट नोव्हेंबर २०१६ मध्ये आणण्यात आली होती.

आरबीआयने म्हटले आहे की, लोक त्यांच्या बँक खात्यात २००० रुपयांच्या नोटा जमा करू शकतात. ही प्रक्रिया अत्यंत साधी आणि कोणत्याही निर्बंधाशिवाय पार पाडता येणार आहे. देशभरातील विविध बँका आणि वित्तीय संस्थांच्या माध्यमातून जमा केलेल्या २००० रुपयांच्या नोटा जमा केल्यानंतर त्या रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्यात येतील. पण या नोटांचे नेमके काय केले जाईल याबाबत जाणून घ्या ही इंटरेस्टिंग फॅक्ट -

या कारणामुळे २००० नोटा आणण्यात आल्या

२०१६ मध्ये दोन हजार रुपयांची नोट चलनात आली होती. दोन हजार रुपयांची नोट आरबीआय कायदा १९३४ च्या कलम २४ (१) अंतर्गत आणण्यात आली. सरकारने नोटाबंदी जाहीर केली. एक हजार रुपयांची नोट बंद झाली. चलनाची गरज असल्याने या नोटा आणण्यात आल्या होत्या. मोठ्या रकमेच्या या नोटा फारशा चलनात नसल्याने २०१८-१९ मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली होती.

२००० रुपयांच्या नोटांचं नेमकं काय होणार

बँका त्यांनी जमा केलेल्या सर्व २००० रुपयांच्या नोटा आरबीआयला पाठवतील. आरबीआय या सर्व नोटांचे बंडल बनवून मशीनद्वारे कापले जातील. या नोटा अगदी बारीक कापल्या जातील. यानंतर त्यांचा लगदा तयार केला जाईल. हा लगदा कचरापेटीत वापरता येतो. या नोटा आता पूर्णपणे चलनातून बाद होणार आहेत.

विभाग

पुढील बातम्या