मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  2000 rupees note ban : २००० नोटेसोबत काढा शेवटचा सेल्फी, पाहा फोटोज

2000 rupees note ban : २००० नोटेसोबत काढा शेवटचा सेल्फी, पाहा फोटोज

May 22, 2023, 05:47 PMIST

नुकतेच आरबीआयने एक परिपत्रक जारी करून ५०० रुपये काढण्याची घोषणा केली. बँकांमध्ये जमा करून २००० रुपयांच्या नोटा बदलून देण्याची प्रक्रिया उद्यापासून (२३ मे) सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत सोमवारी सकाळी आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी जनतेला दिलासा दिला.

  • नुकतेच आरबीआयने एक परिपत्रक जारी करून ५०० रुपये काढण्याची घोषणा केली. बँकांमध्ये जमा करून २००० रुपयांच्या नोटा बदलून देण्याची प्रक्रिया उद्यापासून (२३ मे) सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत सोमवारी सकाळी आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी जनतेला दिलासा दिला.
उद्या, २३ मे पासून बँकेतून बँकेत २००० रुपयांची देवाणघेवाण करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान, एसबीआयने जाहीर केले आहे की, कोणत्याही ओळखपत्राशिवाय २ हजार रुपयांच्या नोटा एकाच वेळी बदलता येतील. मात्र, नोटा बदलून घेण्यापूर्वी अनेक लोक पेट्रोल पंपावर २००० रुपयांच्या नोटा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत.  या निर्णयामुळे अनेकांच्या मनात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. 
(1 / 5)
उद्या, २३ मे पासून बँकेतून बँकेत २००० रुपयांची देवाणघेवाण करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान, एसबीआयने जाहीर केले आहे की, कोणत्याही ओळखपत्राशिवाय २ हजार रुपयांच्या नोटा एकाच वेळी बदलता येतील. मात्र, नोटा बदलून घेण्यापूर्वी अनेक लोक पेट्रोल पंपावर २००० रुपयांच्या नोटा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत.  या निर्णयामुळे अनेकांच्या मनात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. (PTI)
अनेकजण घरी २००० च्या नोटा घेऊन सोन्याचे दुकान गाठत आहेत. त्या नोटेने सोने खरेदी केले जात आहे. परंतु अनेक प्रकरणांमध्ये सोन्याचे दुकान मालक २००० रुपयांच्या नोटा स्वीकारत नाहीेयेत.  वास्तविक भितीची स्थिती नाही. कारण आरबीआयच्या अधिसूचनेत स्पष्टपणे नमूद केले आहे की २०००  रुपयांची नोट अवैध नाही आणि ती ३०  सप्टेंबरपर्यंत व्यवहारांसाठी वापरता येईल.
(2 / 5)
अनेकजण घरी २००० च्या नोटा घेऊन सोन्याचे दुकान गाठत आहेत. त्या नोटेने सोने खरेदी केले जात आहे. परंतु अनेक प्रकरणांमध्ये सोन्याचे दुकान मालक २००० रुपयांच्या नोटा स्वीकारत नाहीेयेत.  वास्तविक भितीची स्थिती नाही. कारण आरबीआयच्या अधिसूचनेत स्पष्टपणे नमूद केले आहे की २०००  रुपयांची नोट अवैध नाही आणि ती ३०  सप्टेंबरपर्यंत व्यवहारांसाठी वापरता येईल.(PTI)
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज सकाळी सांगितले की, चिंतेचे कारण नाही. बाजारात २००० रुपयांच्या सर्व नोटा बदलून घेण्यासाठी बँकांकडे पुरेसे पैसे आहेत. त्यामुळे नोटा बदलून घेण्यासाठी गर्दी करण्यासही त्यांनी मनाई केली. प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी प्रत्यक्षात ३० सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. याशिवाय, कोणतेही दुकान २००० रुपयांच्या नोटा घेण्यास नकार देऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.
(3 / 5)
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज सकाळी सांगितले की, चिंतेचे कारण नाही. बाजारात २००० रुपयांच्या सर्व नोटा बदलून घेण्यासाठी बँकांकडे पुरेसे पैसे आहेत. त्यामुळे नोटा बदलून घेण्यासाठी गर्दी करण्यासही त्यांनी मनाई केली. प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी प्रत्यक्षात ३० सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. याशिवाय, कोणतेही दुकान २००० रुपयांच्या नोटा घेण्यास नकार देऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.(PTI)
३०  सप्टेंबरनंतर कोणाकडे २००० रुपयांच्या नोटा असतील तर त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल का? २००० रुपयांच्या नोटा बेकायदेशीर घोषित करण्यात आल्या नसल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. या स्थितीत ३० सप्टेंबरनंतर कोणाकडे २००० रुपयांची नोट असेल तर त्या व्यक्तीवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही.
(4 / 5)
३०  सप्टेंबरनंतर कोणाकडे २००० रुपयांच्या नोटा असतील तर त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाईल का? २००० रुपयांच्या नोटा बेकायदेशीर घोषित करण्यात आल्या नसल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. या स्थितीत ३० सप्टेंबरनंतर कोणाकडे २००० रुपयांची नोट असेल तर त्या व्यक्तीवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही.(PTI)
देशाच्या सर्वोच्च बँकेच्या मते, या निर्णयाचा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या केवळ ११ टक्के भागावर परिणाम होईल. पण २०००  रुपयांची नोट आता बेकायदेशीररित्या चलनात असणार नाही.  सध्या या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत वैध असतील. या नोटा २३ मे ते ३० सप्टेंबर दरम्यान सर्वसामान्य लोक ती बदलून घेऊ शकतात. २००० रुपयांच्या नोटांची छपाई सुमारे ७ वर्षांपूर्वी सुरू झाली होती. मात्र, आरबीआयने या नोटा बाजारातून काढून घेण्याचे आधीच नियोजन केले होते.
(5 / 5)
देशाच्या सर्वोच्च बँकेच्या मते, या निर्णयाचा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या केवळ ११ टक्के भागावर परिणाम होईल. पण २०००  रुपयांची नोट आता बेकायदेशीररित्या चलनात असणार नाही.  सध्या या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत वैध असतील. या नोटा २३ मे ते ३० सप्टेंबर दरम्यान सर्वसामान्य लोक ती बदलून घेऊ शकतात. २००० रुपयांच्या नोटांची छपाई सुमारे ७ वर्षांपूर्वी सुरू झाली होती. मात्र, आरबीआयने या नोटा बाजारातून काढून घेण्याचे आधीच नियोजन केले होते.(PTI)

    शेअर करा