मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Weekly Panchang 26 May To 1st June : विवाह मुहूर्त पाहायचे आहेत?, जागा खरेदी करायची आहे?,पाहा पंचांग

Weekly Panchang 26 May To 1st June : विवाह मुहूर्त पाहायचे आहेत?, जागा खरेदी करायची आहे?,पाहा पंचांग

May 26, 2023, 10:29 AM IST

  • Weekly Panchang : प्रचलित ग्रहस्थितीच्या आधारे दैनंदिन कामे करण्यासाठी शुभ आणि अशुभ वेळ ठरवण्यासाठी २६ मे ते ०१ जून दरम्यानचे साप्ताहिक पंचांग.

साप्ताहिक पंचांग (HT)

Weekly Panchang : प्रचलित ग्रहस्थितीच्या आधारे दैनंदिन कामे करण्यासाठी शुभ आणि अशुभ वेळ ठरवण्यासाठी २६ मे ते ०१ जून दरम्यानचे साप्ताहिक पंचांग.

  • Weekly Panchang : प्रचलित ग्रहस्थितीच्या आधारे दैनंदिन कामे करण्यासाठी शुभ आणि अशुभ वेळ ठरवण्यासाठी २६ मे ते ०१ जून दरम्यानचे साप्ताहिक पंचांग.

या आठवड्यात भारताच्या विविध भागात गंगा दसरा आणि गायत्री जयंती हे सण साजरे केले जातील. ग्रहांच्या संक्रमणाबद्दल बोलायचं झाल्यास, प्रेम आणि सौंदर्याचा ग्रह शुक्र कर्कराशीच्या पाणथळ आणि भावनिक राशीत प्रवेश करेल.

संबंधित फोटो

Rashi Bhavishya Today : चतुष्पाद करणात कसा जाईल आजचा मंगळवारचा दिवस! वाचा राशीभविष्य

May 07, 2024 04:00 AM

Gajkesari rajyog: गजकेसरी राजयोगात उजळणार ‘या’ ३ राशींचे भाग्य! उत्पन्न आणि मान-सन्मान वाढणार

May 06, 2024 09:11 PM

Rashi Bhavishya Today : सोमवारचा शिवरात्रीचा आजचा दिवस कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 06, 2024 04:00 AM

Lucky Rashi: जन्मतःच पैशाला आकर्षित करणाऱ्या असतात ‘या’ राशीचे लोक! पाहा कोणत्या आहेत या राशी

May 05, 2024 12:35 PM

Rashi Bhavishya Today : प्रदोष व्रताचा आजचा दिवस कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 05, 2024 04:00 AM

Guru Shukra Yuti : वृषभ राशीत होणार गुरू-शुक्र युती, आता या ५ राशींची पूर्ण होणार सर्व स्वप्ने

May 04, 2024 03:45 PM

या आठवड्यात शुभ मुहूर्त कोणते?

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या शुभ मुहूर्तावर एखादे कार्य यशस्वीरित्या पूर्ण होण्याच्या शक्यतांमध्ये लक्षणीय वाढ होते.

या आठवड्यातले विवाह मुहूर्त कोणते : या आठवड्यात लग्नासाठी शुभ मुहूर्त २७ मे (रात्री ०८.५१ ते  रात्री ११.४३), २९ मे (सकाळी ०९.०१ ते संध्याकाळी ०५.२४), ३० मे (पहाटे ०५.२४ ते रात्री ०८.५५) रोजी उपलब्ध आहेत आणि ०१ जून (सकाळी ०७.०१ ते संध्याकाळी ०६.५३)

या आठवड्यातले गृहप्रवेश मुहूर्त कोणते : गृहप्रवेशासाठी शुभ मुहूर्त या आठवड्यात २९ मे रोजी उपलब्ध आहेत ( सकाळी ११.४९ ते ३० मे पहाटे ०४.२९) आणि ३१ मे (सकाळी ०६.०२ ते दुपारी ०१.४४)

या आठवड्यातले मालमत्ता खरेदीचे मुहूर्त कोणते: मालमत्ता खरेदीसाठी शुभ मुहूर्त या आठवड्यात २६ मे रोजी उपलब्ध आहे (पहाटे ०५.२४ ते २७ मे पहाटे ०५.२५)

या आठवड्यातले वाहन खरेदीचे मुहूर्त कोणते: या आठवड्यात वाहन खरेदीसाठी शुभ मुहूर्त ३१ मे (पहाटे ०५.२४ ते  दुपारी ०१.४५) आणि ०१ जून (दुपारी ०१.४० ते ०२ जून पहाटे ०५.२३) रोजी उपलब्ध आहे.

या आठवड्यात आगामी ग्रह संक्रमण कोणती?

वैदिक ज्योतिषशास्त्रात, ग्रहांचे संक्रमण विशेषतः महत्त्वपूर्ण आहेत कारण ते जीवनातील बदल आणि प्रगतीचा अंदाज घेण्याचा मुख्य मार्ग आहेत.

२६ मे, शुक्रवार, सकाळी ११.१४ वाजता सूर्य आणि चंद्र व्यतिपात

२८ मे, रविवार, दुपारी ०४.१२ वाजता सूर्य आणि शनि ९० अंशाच्या कोनात स्थित असतील.

शुक्र ३० मे, मंगळवार, संध्याकाळी ०७.५१ वाजता कर्क राशीत प्रवेश करेल

या आठवड्यात येणारे सण कोणते?

गंगा दसरा (मंगळवार, मे ३०): हा एक महत्त्वपूर्ण हिंदू सण आहे. या दिवशी गंगा पृथ्वीवर अवतरली होती.  या दिवशी गंगेच्या पवित्र पाण्यात स्नान केल्याने पापं धुवून निघतात आणि मुक्ती मिळते असा भक्तांंचा समज आहे.

ज्येष्ठ गायत्री जयंती (बुधवार, मे ३१): हा एक हिंदू सण आहे जो देवी गायत्रीचा जन्म साजरा करतो. हिंदू कॅलेंडरमधील ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशीला गायत्री जयंती साजरी केली जाते. गायत्री ही बुद्धी आणि ज्ञानाची देवी आहे. ती वेदांची माता देखील आहे.

या आठवड्यात अशुभ राहू काल कोणते?

वैदिक ज्योतिषानुसार राहू हा अशुभ ग्रह आहे. ग्रहांच्या संक्रमणादरम्यान राहूच्या प्रभावाखालील काळात कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे.

२६ मे: सकाळी १०.३५ ते दुपारी १२.१८ पर्यंत

२७ मे: सकाळी ०८.५२ ते सकाळी १०.३५

२८ मे : संध्याकाळी ०५.२८ ते संध्याकाळी ०७.१२

२९ मे : सकाळी ०७.०७ ते सकाळी ०८.५१

३० मे: दुपारी ०३.४५ ते संध्याकाळी ०५.३० 

३१ मे : दुपारी १२.१८ ते दुपारी ०२.०३

०१ जून : दुपारी ०२.०३ ते दुपारी ०३.४६

विभाग