मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Vastu Tips For Home : दक्षिण दिशाच नाही तर ही दिशाही असते खतरनाक, पाहा काय सांगतं वास्तुशास्त्र?

Vastu Tips For Home : दक्षिण दिशाच नाही तर ही दिशाही असते खतरनाक, पाहा काय सांगतं वास्तुशास्त्र?

May 23, 2023, 03:05 PM IST

  • Vastu Shastra For Home : फक्त दक्षिण दिशाच महत्वाची नाही तर आणखी एक दिशा आहे जिथे अवजड सामान किंवा कचरा जमा झाला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

वास्तुनुसार कोणती दिशा असते महत्वाची (HT)

Vastu Shastra For Home : फक्त दक्षिण दिशाच महत्वाची नाही तर आणखी एक दिशा आहे जिथे अवजड सामान किंवा कचरा जमा झाला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

  • Vastu Shastra For Home : फक्त दक्षिण दिशाच महत्वाची नाही तर आणखी एक दिशा आहे जिथे अवजड सामान किंवा कचरा जमा झाला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

वास्तुशास्त्रात दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि यादिशेला काही अवजड वस्तू किंवा कचरा जमा झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात असं सांगण्यात आलं. आपण त्या प्रकारे दक्षिण दिशेला कमीत कमी सामान ठेवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्या दिशेला आपण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र फक्त दक्षिण दिशाच महत्वाची नाही तर आणखी एक दिशा आहे जिथे अवजड सामान किंवा कचरा जमा झाला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात आणि ती दिशा आहे पूर्व दिशा.वास्तूनुसार, पूर्व दिशा वायु तत्वाचे प्रतिनिधित्व करते. अशा स्थितीत या दिशेतून ऊर्जा, ताजेपणा आणि आनंद मिळतो. म्हणूनच या दिशेला काही गोष्टी ठेवताना देखील काळजी घेणे आवश्यक आहे.

संबंधित फोटो

Rashi Bhavishya Today : सोमवारचा शिवरात्रीचा आजचा दिवस कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 06, 2024 04:00 AM

Lucky Rashi: जन्मतःच पैशाला आकर्षित करणाऱ्या असतात ‘या’ राशीचे लोक! पाहा कोणत्या आहेत या राशी

May 05, 2024 12:35 PM

Rashi Bhavishya Today : प्रदोष व्रताचा आजचा दिवस कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 05, 2024 04:00 AM

Guru Shukra Yuti : वृषभ राशीत होणार गुरू-शुक्र युती, आता या ५ राशींची पूर्ण होणार सर्व स्वप्ने

May 04, 2024 03:45 PM

Panchak 2024: सुरू आहे पंचक काळ! चुकूनही 'या' वेळेत करू नका शुभ कामं! जाणून घ्या अशुभ वेळ

May 04, 2024 01:50 PM

Rashi Bhavishya Today : वरुथिनी एकादशीचा आजचा दिवस कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 04, 2024 04:27 AM

पूर्व दिशेला कोणत्या गोष्टी असाव्यात कोणत्या गोष्टी नसाव्यात?

वास्तुशास्त्रानुसार घराची पूर्व दिशा हे घराच्या समृद्धीचे द्वार आहे. म्हणूनच या दिशेला चुकूनही कचरा जमा होता कामा नये. याशिवाय घराची पूर्व दिशा नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा.

वास्तुशास्त्र मानते की घराची पूर्व दिशा वायु तत्व दर्शवते. त्यामुळे घराच्या या दिशेला कधीही जड वस्तू ठेवू नये. तरीही जड सामान या दिशेला ठेवायचे असेल तर या दिशेला कमीत कमी जड सामान ठेवण्याचा प्रयत्न करा.

घराची पूर्व दिश जल तत्वही दर्शवते. त्यामुळे या दिशेला पाण्याचे स्थान बनवणे शुभ मानले जाते. तुम्ही तुमच्या घराच्या पूर्व दिशेला पाण्याची टाकी किंवा विहीर बनवू शकता. अशा वस्तू या दिशेला ठेवाव्यात जेणेकरुन घरात हवेचा संचार कायम राहील.

वास्तुशास्त्रानुसार घर बांधताना हे लक्षात ठेवले पाहिजे की घराच्या पूर्वेकडील भिंतीची उंची कमी असावी. या दिशेच्या भिंतीची उंची जितकी कमी तितकीच घरातील सदस्यांना प्रसिद्धी, प्रतिष्ठा आणि सन्मान मिळतो असं वास्तुशास्त्र सांगतं.

जर तुम्ही नवीन घर बांधत असाल तर वास्तूचे नियम अवश्य पाळा. वास्तूनुसार घराच्या पूर्व दिशेला मोठी खिडकी बनवावी. असे केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग