मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Mesh Vrishabh Mithun kark horoscope : मिथुन राशीच्या लोकांना प्रवास ठरेल आर्थिक लाभाचा! वाचा चारही राशींचे भविष्य!

Mesh Vrishabh Mithun kark horoscope : मिथुन राशीच्या लोकांना प्रवास ठरेल आर्थिक लाभाचा! वाचा चारही राशींचे भविष्य!

Apr 28, 2024, 11:34 AM IST

    • Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya 28 April 2024 : मेष, वृषभ, मिथुन व कर्क या राशीचक्रातील पहिल्या ४ राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.
मेष, वृषभ, मिथुन व कर्क

Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya 28 April 2024 : मेष, वृषभ, मिथुन व कर्क या राशीचक्रातील पहिल्या ४ राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

    • Aries Taurus Gemini Cancer rashi bhavishya 28 April 2024 : मेष, वृषभ, मिथुन व कर्क या राशीचक्रातील पहिल्या ४ राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या राशीभविष्य.

Mesh Vrishabh Mithun kark horoscope : आज चंद्र धनु राशीत संक्रमण करणार आहे. मेष, वृषभ, मिथुन व कर्क या चारही राशीसाठी आजचा दिवस कसा जाईल, वाचा राशीभविष्य.

संबंधित फोटो

Rashi Bhavishya Today : अक्षय्य तृतीयेचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 10, 2024 04:00 AM

Akshay Tritiya 2024: एक-दोन नव्हे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ५ महायोग! ‘या’ राशींना मिळणार भरपूर फायदा

May 09, 2024 05:34 PM

Rashi Bhavishya Today : वैशाख मासारंभचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 09, 2024 04:00 AM

Akshay Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेनंतर ‘या’ ३ राशींचं नशीब फळफळणार! पैसा अन् सन्मान भरभरून मिळणार

May 08, 2024 03:17 PM

Rashi Bhavishya Today : चैत्र अमावस्येचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल! वाचा राशीभविष्य

May 08, 2024 04:00 AM

Mars Transit : मंगळाचे १ वर्षानंतर संक्रमण, मेष राशीत प्रवेश करून या ३ राशींसाठी ठरेल धन-समृद्धीकारक

May 07, 2024 03:28 PM

मेषः 

आजच्या चंद्र गुरू षडाष्टक योगात किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. उत्तम कल्पनाशक्तीचा आविष्कार तुमच्यात पहायला मिळेल. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल. जुनी मित्रमंडळी भेटतील. अहंकार बाजूला ठेवला तर बऱ्याच गोष्टी साधून जातील. एखादी गोष्ट सातत्याने करण्याचा निश्चय कराल. तुमच्या रसिकतेला उधाण येईल. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता असून धनलाभ होण्याचा योग आहे. आर्थिक उन्नती करणारा दिवस ठरेल. आपले सुप्त गुण प्रकर्षाने उजळून निघतील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल.

शुभरंगं: तांबूस, शुभदिशाः दक्षिण, शुभअंकः ०७, ०९.

वृषभ: 

आज शिव योगात सामाजिक कामात मान सन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रवासात पैशाचा व्यय होण्याचाच जास्त संभव आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार कराल. आणि कंटाळा न करता कामाला लागाल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखावह होण्यासाठी उत्तम नियोजनाची आवश्यकता भासेल. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी कराल. परंतु त्यामुळे आपले मनःस्वास्थ्य मात्र हरवून बसाल. अशावेळी नको ते धाडसी निर्णय घेण्याची शक्यता आहे. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल.व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांवर मात्र मर्यादा राखा. कायदेशीर बाबी पूर्ण करा. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे.

शुभरंगः गुलाबी, शुभदिशाः पश्चिम, शुभअंकः ०२, ०७.

मिथुनः 

आज चंद्राचं मुळ नक्षत्रातुन होणारं भ्रमण पाहता राजकीय सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करायला हरकत नाही. ज्यांना व्यसन आहे त्यांनी ते कमी करण्याचा प्रयत्न करावा. पार्टनरशिपच्या धंद्यात एकमेकांशी पटणे जरा अवघड राहील. अशावेळी शांत रहाणे श्रेयस्कर ठरेल. गूढ गोष्टींची आवड निर्माण होईल. स्वतंत्र विचार कराल. व्यवसायात लाभ होतील. प्रवासाचे योग आहेत पण तुमच्या मुडी स्वभावामुळे प्रवासात इतरांशी पटणे अवघड जाईल. व्यापारात आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबावर खर्च होईल. नियोजीत काम वेळेवर पूर्ण कराल. परदेशगमनाचा अथवा दुरचे प्रवास घडणार आहेत. आर्थिकदृष्ट्या प्रवास लाभदायक ठरतील. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आपल्या हातून चांगले कार्य घडेल.

शुभरंगः हिरवा, शुभदिशाः उत्तर, शुभअंकः ०५, ०८.

कर्कः 

आज प्रतिकूल ग्रहयुतीमुळे दुर्मिळ गोष्टींचा संग्रह कराल. झोपेची तक्रार राहील. व्यवसायातील अडलेली कामे मार्गी लागतील. दुसरे काय म्हणतात यापेक्षा तुमचे अंतर्मन तुम्हाला काय सांगते याचा विचार करावा. काम करण्यासाठी बुद्धीबरोबर चिकाटीही हवी शक्ती आणि युक्तीचा सुरेख संगम व्यवहारात दिसेल. घरातील दोन पिढ्यांमध्ये संघर्ष संभवतो. परंतु वेळीच सर्व गोष्टी उघड बोलून वातावरण थंड कराल. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्व कराल. फाजिल आत्मविश्वासाचा अतिरेक करणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेवर नियंत्रण ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहिल. विरोधक डोके वर काढतील. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता राहिल. कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भभवतील. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही. याची दक्षता घ्या. अनावश्यक कामात वेळ वाया घालू नका. कामचुकारपणा करू नका. शक्यतो प्रवास टाळा.

शुभरंगः पांढरा, शुभदिशाः वायव्य, शुभअंकः ०४, ०५.