(2 / 12)मेष: आज आज ग्रहमान अनुकुल असल्याने नवीन प्रॉपर्टीसंबंधी विचार चालले असतील तर प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायला उत्तम ग्रहयोग आहे. संशोधन क्षेत्रात काम करणारांची प्रगती होईल. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल. व्यवसायात जम बसेल. सार्वजनिक कामची आवड राहील. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या. साहित्यिक क्षेत्रात आपल्या कार्याचा विस्तार वाढेल. शुभरंगः केशरी शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०४, ०७.