वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्याच्या हालचालीचा परिणाम सर्व राशींवर होतो. त्यामुळे अनेक राशीच्या लोकांना भरभरून लाभ होणार आहे. सूर्याची राशी जसजशी बदलते तसतसे नक्षत्रही बदलतात. आगामी काळात सूर्य एका विशेष तिथीला कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करत आहे. त्यामुळे अनेक राशींचे नशीब पालटणार आहे.
११ मे रोजी संध्याकाळी ६ वाजून १३ मिनिटांनी सूर्य कृतिका नक्षत्रात प्रवेश करत आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी अनेक राशींचे नशीब फळफळणार आहे. १० मे रोजी अक्षय्य तृतीया आहे. आणि यावेळी ११ मे रोजी सूर्य नक्षत्र बदलत आहे. त्यानंतर २५ मे रोजी पहाटे ३ वाजून २७ मिनिटांपर्यंत सूर्य कृतिका नक्षत्रात राहील. सूर्याच्या या गोचरामुळे अक्षय्य तृतीया झाल्यानंतर कोणत्या राशींचे नशीब फळफळणार ते जाणून घेऊया…
वृषभ : विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ येणार आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. जे व्यावसायिक जीवनात आहेत त्यांना नफा मिळेल. उत्पन्न चांगले राहील. ध्येय सहज साध्य होईल. नोकरीत प्रत्येकाकडून फायदा होईल.
कर्क : ऑफिसमध्ये उच्चपदस्थांची साथ मिळेल. करिअरमध्ये मोठे यश मिळेल. पदोन्नती आणि वेतनवाढीची भर पडेल. तुमची मेहनत पाहून अनेक जण तुम्हाला काही अतिरिक्त जबाबदाऱ्या देऊ शकतात. व्यवसायात फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. मान-सन्मानात वाढ होईल. कुटुंबासमवेत चांगला वेळ व्यतीत होईल.