मराठी बातम्या  /  विषय  /  lok sabha election 2024

Latest lok sabha election 2024 Photos

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान आज (२० मे) होत आहे. पाचव्या टप्प्यात ६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या ४९ जागांवर मतदान होत आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्रातील १३ जागांचा समावेश आहे. आज मुंबईत सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि अजिंक्य रहाणे यांच्यासह दिग्गज क्रिकेटपटूंनी मतदानाचा हक्क बजावला.

Lok Sabha Elections 2024 : सचिन-अर्जुन ते अजिंक्य रहाणे… क्रिकेटपटूंनी मुंबईत केलं मतदान, फोटो पाहा

Monday, May 20, 2024

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान सुरू आहे आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक सेलिब्रेटींनी आज त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. बॉलीवूड अभिनेते आणि खासदार परेश रावल यांनी मुंबईत त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला.   मतदान केल्यानंतर परेश रावल मीडियासमोर अशी प्रतिक्रिया देताना दिसले.

Loksabha Election 2024: मुंबईत सेलिब्रेटींचे मतदान! जान्हवी-अक्षयपासून सुनील शेट्टीपर्यंत यांनी बजावला हक्क

Monday, May 20, 2024

Mumbai (South) Lok Sabha Constituency: दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांच्यात लढत होतय. यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत. पूर्वी नगरसेविका म्हणूनही त्यांनी या भागात काम केले आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ जुन्या मुंबईच्या कुलाब्यापासून शिवडी, भायखळा, मुंबादेवी, मलबार हिल ते वरळीपर्यंत विस्तारलेला आहे. प्रामुख्याने जुन्या मुंबईचा हा भाग असल्याने जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास, वाहतुकीची समस्या, रोजगार या येथील प्रमुख समस्या आहेत. विद्यमान खासदार, शिवसेना (ठाकरे गटाचे) उमेदवार अरविंद सावंत हे गेली दहा वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.

Mumbai Lok Sabha fight: मुंबई शहरातील ६ लोकसभा मतदारसंघात असे रंगणार सामने; लोकसभा लढतींचा संपूर्ण तपशील

Friday, May 17, 2024

पुणे लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान होत आहे. महायुती कडून भाजपचे मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीकडून कॉँग्रेचे उमेदवार रवींद्र धंगेकर निवडणूक रिंगणात उभे आहेत.

Pune loksabha : राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी पुणेकरांचा उत्साह! सकाळपासून मतदान केंद्रांवर रांगा लावून बजावला हक्क

Monday, May 13, 2024

पुणे जिल्ह्यातील जिल्ह्यातील पुणे, मावळ, शिरूर लोकसभा मतदार संघासाठी उद्या सोमवारी मतदान होणार आहे. येथील निवडणूक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर मतदानाचे साहित्य वाटप करण्यात आले आहे. अनेक कर्मचारी ही मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत.

Pune Lokasbha Election : पुणे जिल्ह्यातील ३ लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान! सात हजार पोलिस तैनात, ईव्हीएमचे वितरण

Sunday, May 12, 2024

देशाच्या विविध भागांमध्ये लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरू असताना अनेक प्रमुख राजकीय नेत्यांनी मतदान केले आहे. त्यांच्या मताधिकाराचा वापर करताना टिपण्यात आलेले छायाचित्र.

Lok Sabha Election: पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, शरद पवार आदी नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क; पाहा फोटो

Tuesday, May 7, 2024

मतदारसंघनिहाय निवडणुकीच्या अनुषंगाने साहित्याचे वाटप आज ६ मे रोजी करण्यात आले. दौंड विधानसभा मतदासंघाकरीता शासकीय धान्य गोदाम, मदर तेरेसा चौक, नगरमोरी दौंड, इंदापूर विधानसभा मतदारसंघाकरीता शासकीय धान्य गोदाम कालठण रोड, इंदापूर, बारामती विधानसभा मतदारसंघाकरीता महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळ परिसर, बारामती, पुरंदर विधानसभाकरीता श्री कातोबा हायस्कूल दिवे, भोर मतदारसंघात भोर तालुक्याकरीता औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर आणि वेल्हे तालुक्याकरीता जुनी पंचायत समिती, वेल्हे व जिल्हा परिषद मध्यवर्ती शाळा कुरण खुर्द, मुळशी तालुक्याकरीता राणी लक्ष्मीबाई सैनिकी मुलींची शाळा कासार आंबोली, आणि खडकवासला मतदारसंघाकरीता स्प्रिंग डेल प्ले ग्रांऊड वडगाव बु. ता. हवेली येथून वितरण करण्यात आले.

Baramati loksabha Election: बारामती लोकसभा निवडणुकीसाठी मतदान साहित्याचे वाटप; अधिकारी केंद्राकडे रवाना; पाहा फोटो

Monday, May 6, 2024

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे मतदारसंघातील शिवसेना (शिंदे गट) उमेदवार नरेश म्हस्के यांच्या ठाणे, महाराष्ट्रातील उमेदवारी रॅलीत समर्थकांना संबोधित करताना.

Loksabha Election : लोकसभा निवडणूक प्रचारात दिग्गज उतरले मैदानात! जोरदार शक्ति प्रदर्शन करत मतदारांना घालतायेत साद

Saturday, May 4, 2024

New Delhi Loksabha constituency: नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात एकूण १० विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या मतदारसंघात एकूण१४.८ लाख मतदार असून मतदारांच्या संख्येनुसार हा दिल्लीतला सर्वात छोटा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ साली मीनाक्षी लेखी भाजप खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. लेखी यांनी २०१४ साली 'आप' नेते, माजी पत्रकार आशिष खेतान आणि २०१९ साली कॉंग्रेसचे यांचा पराभव केला होता. परंतु भाजपने येथून माजी केंद्रीय मंत्री, दिवंगत सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज हिला उमेदवारी दिली आहे. बांसुरीचा सामना ‘आप’चे तीन वेळा आमदार असलेले सोमनाथ भारती यांच्याशी होणार आहे. सध्या जेलमध्ये असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघसुद्धा याच लोकसभा मतदारसंघात येतो.

Loksabha Explainer : दिल्लीच्या सातही जागांवर भाजपसमोर ‘आप-कॉंग्रेस’ युतीचं कडवं आव्हान; जाणून घ्या दिल्ली लढतीचं चित्र

Tuesday, April 30, 2024

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ८८ मतदारसंघांमध्ये आज सकाळी ७ मतदानाला सुरुवात झाली. मतदान करण्यासाठी सकाळपासून मतदारांचा उत्साह होता.

Lok Sabha Election:दुसऱ्या टप्प्यात ८८ जागांसाठी मतदानासाठी मतदारांचा उत्साह; अनेक केंद्रांपुढे लागल्या रांगा, पाहा फोटो

Friday, April 26, 2024

त्रिपुरातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या पूर्वसंध्येला मतदान अधिकारी निवडणूक मतदान केंद्रांवर जाण्यासाठी निघाले. अनेक अडचणी पार करत हे मतदान केंद्रांवर पोहोचले.

Loksabha Election : लोकशाही उत्सवाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज! अनेक अडथळे पार करून अधिकारी केद्रांवर

Friday, April 26, 2024

काँग्रेस भागलपूरची जागा अनेक वर्षांनंतर लढवत आहे आणि राहुल गांधी यांनी शनिवारी भागलपूरमध्ये शर्मा यांच्या समर्थनार्थ निवडणूक रॅलीला संबोधित केले.

Neha Sharma: वडील अजित शर्मा यांच्या समर्थनार्थ बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्माचा बिहारमध्ये रोड शो!

Thursday, April 25, 2024

विदर्भात सर्वाधिक चर्चेत असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार नवनीत राणा आणि कॉंग्रेसचे बळवंत वानखडे यांच्या थेट लढत होत आहे. या मतदारसंघात बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ पक्षाचे दिनेश बुब रिंगणात आहेत. हनुमान चालिसा प्रकरणामुळे राज्यभरात गाजलेल्या खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर त्यांना मोठा दिलासा मिळाला होता. दरम्यान, राणा यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तर वानखडेंसाठी प्रचारासाठी राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अमरावतीत सभा घेतल्या.

Loksabha Explainer: महाराष्ट्रात लोकसभेच्या 'या' ८ जागांवर २६ एप्रिल रोजी मतदान; आठही जागांच्या लढतींची संपूर्ण माहिती

Wednesday, April 24, 2024

आज देशात लोकशाहीचा उत्सवाला सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान आज होणार आहे. राज्यातील पाच तर देशात १०२ जागांवर मतदान होणार आहे. हे मतदान शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावे यासाठी राज्यातील मतदारसंघात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. तामिळनाडूमध्ये कलाकारांनी मतदान केले आहे.

रजनीकांत ते कमल हासन; दाक्षिणात्य कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क! मतदान करण्याचे केले आवाहन

Friday, April 19, 2024

लोकसभा निवडणूक २०२४ च्या पहिल्या टप्यात मतदानाला सुरुवात झाली आहे.  निवडणूक आयोगाने  नागरिकांना मतदार ओळखपत्राशिवाय मतदान करणे सोपे केले आहे. निवडणूक आयोगाने  ११  पर्यायी कागदपत्रांद्वारे  मतदान करता येईल असे स्पष्ट केले आहे.  ज्यांचा वापर मतदान केंद्रांवर जातांना करता येऊ शकतो व मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

Lok Sabha Election 2024 : मतदानाला जाताय! या ११ पर्यायी कागदपत्रांद्वारे करू शकणार मतदान; पाहा यादी

Friday, April 19, 2024

आसाममधील गोलाघाट येथील लोहोरे चापोरी येथे मतदानाच्या पहिल्या फेरीच्या पूर्वसंध्येला मतदान केंद्रावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (EVM) बोटीने मतदान केंद्रावर नेण्यात आले. यावेळी ईव्हीएम मशींनसह बोटीतून उतरणारे    निवडणूक अधिकारी

Loksabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज! दुर्गम भागातही पोहोचले मतदान यंत्रे; पाहा फोटो

Friday, April 19, 2024

नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री, विद्यमान भाजप खासदार नितीन गडकरी यांची लढत कॉंग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्यात होत आहे. विदर्भाच्या तडपत्या उन्हात गडकरी आणि ठाकरे या दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात येऊन गडकरींच्या प्रचारात सहभाग घेतला होता. दरम्यान, विकास ठाकरे यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे.

Loksabha Explainer: महाराष्ट्रात लोकसभेच्या 'या' ५ जागांवर उद्या मतदान; पाचही जागांच्या लढतींची संपूर्ण माहिती

Thursday, April 18, 2024

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरूर आणि पुणे शहर येथील लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज लोकसभा निवणुकीसाठी अर्ज भरले. बारामती लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष शरद पवार पक्षातर्फे ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्ति प्रदर्शन केले.  सुप्रिया सुळे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत खासदार अमोल कोल्हे, आमदार रविद्र धंगेकर, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, विश्वजित कदम, बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

loksabha election : देवदर्शन, रोड शो आणि सभा घेत मविआ आणि महायुतीच्या उमेदवारांनी भरले अर्ज

Thursday, April 18, 2024

राजस्थानमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. विविध पक्ष निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. विधानसभा निवडणुकित पराभवानंतर आता लोकसभेची जय्यत तयारी  काँग्रेसने सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून अलवर येथे निवडणूक रॅलीदरम्यान काँग्रेस नेत्या  प्रियंका गांधी वढेरा आणि अशोक गेहलोत.

loksabha election 2024: भाजप कडून मोदी. योगी, शहा तर कॉँग्रेसच्या राहुल अन् प्रियंकाकडून प्रचार सभांचा धडाका!

Tuesday, April 16, 2024

कर्नाटकातील शिवमोग्गा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार के.एस. ईश्वरप्पा यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भव्य  रॅली काढून शक्ति प्रदर्शन केले. मतदार राजाला आकर्षित करण्यासाठी विविधी योजना देखील घोषित केल्या जात आहेत.

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला! मतदारराजाला आकर्षित करण्यासाठी उमेदवारांच्या 'नाना तऱ्हा'

Saturday, April 13, 2024