मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Kohli Gambhir Fight : आयपीएलममध्ये भांडणाऱ्या विराट-गंभीरला अनिल कुंबळेने झापलं, म्हणाला…

Kohli Gambhir Fight : आयपीएलममध्ये भांडणाऱ्या विराट-गंभीरला अनिल कुंबळेने झापलं, म्हणाला…

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 03, 2023 07:00 PM IST

Anil Kumble On Kohli Gambhir Fight : लखनौ आणि आरसीबीत झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वादावादी झाली होती.

Anil Kumble On Kohli Gambhir Fight
Anil Kumble On Kohli Gambhir Fight (HT)

Anil Kumble On Kohli Gambhir Fight : आयपीएलमध्ये आरसीबी आणि लखनौत झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. अमित मिश्रा आणि नवीन उल-हक यांच्याशी वाद झाल्यानंतर गौतम गंभीर विराट कोहलीशी भिडला होता. त्यामुळं आता या दोन्ही स्टार खेळाडूंच्या गैरवर्तनामुळं सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातच आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने विराट गंभीरच्या वादावर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. याशिवाय रॉबिन उथप्पा याने देखील विराट आणि गंभीर यांच्यातील वादावादी दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आयपीएलमध्ये गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील वादावर बोलताना अनिल कुंबळे म्हणाला की, अनेकदा खेळाडूंना सामना सुरू असतानाच आक्रमक व्हावसं वाटतं. परंतु तुम्ही जे बोलता तेच योग्य म्हणून स्वीकारलं जाऊ शकत नाही. मैदानावर काहीही झालं तरी खेळाडूंनी एकमेकांचा आदर करायला हवा. हात झटकणे, एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, आक्रमक होणे आणि शिवीगाळ करणे या गोष्टींमुळं क्रिकेटचा दर्जा खाली जावू शकतो. मैदानावर रागाच्या भरात काहीही बोललं जातं, परंतु सामना संपल्यानंतर खेळाडूंनी वाद मिटवून घ्यायला हवा. विराट आणि गंभीर यांनी मैदानावर जे केलं, ते अजिबात योग्य नव्हतं. ते टाळता आलं असतं, असं म्हणत अनिल कुंबळेने विराट कोहली आणि गौतम गंभीर यांना चांगलंच खडसावलं आहे.

Rajat Patidar IPL 2023 : आरसीबीसाठी आनंदाची बातमी, रजत पाटीदारवर शस्त्रक्रिया यशस्वी

तिघांवर कठोर कारवाई व्हायला हवी होती- उथप्पा

आयपीएलमधील सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वादावादी झाल्यामुळं अनिल कुंबळे यांच्यासह भारताचा माजी सलामीवीर रॉबिन उथप्पा यानेही निराशा व्यक्त केली आहे. खेळाडूंनी मैदानावर असं वर्तन करणं योग्य नाही. एखाद्या गोलंदाजाने असं काही केलं असतं, तर त्याच्यावर कठोर कारवाई झाली असती. त्यामुळं कोहली, गंभीर आणि नवीन उल-हक यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी होती, असं रॉबिन उथप्पाने म्हटलं आहे.

WhatsApp channel