LSG vs CSK IPL 2023 : पावसामुळं सीएसके-लखनौतील सामना रद्द, दोन्ही संघांना मिळणार प्रत्येकी एक गुण
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  LSG vs CSK IPL 2023 : पावसामुळं सीएसके-लखनौतील सामना रद्द, दोन्ही संघांना मिळणार प्रत्येकी एक गुण

LSG vs CSK IPL 2023 : पावसामुळं सीएसके-लखनौतील सामना रद्द, दोन्ही संघांना मिळणार प्रत्येकी एक गुण

Updated May 03, 2023 07:48 PM IST

LSG vs CSK IPL 2023 : मुसळधार पावसामुळं तासाभरापासून सामना थांबवण्यात आला होता. परंतु पावसाने विश्रांती न घेतल्यामुळं सामना रद्द करण्यात आला आहे.

Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Score
Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Score (HT)

Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Live Score : आयपीएलच्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनौ सुपरजायंट्समध्ये सामना होणार आहे. आजचा सामना जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. याशिवाय लखनौच्या कृणाल पांड्या आणि सीएसकेच्या महेंद्रसिंह धोनीवर सर्वांच्या नजरा असणार आहे.

 

पावसामुळं सीएसके-लखनौतील सामन्यात निकाल नाही, दोन्ही संघांना मिळणार प्रत्येकी एक गुण

  • गेल्या तासाभरापासून लखनौत होत असलेल्या मुसळधार पावसामुळं सीएसके आणि लखनौतील सामना आयपीएलच्या प्रशासकीय समितीने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळणार आहे. प्रथम फलंदाजी करताना लखनौच्या संघाने १९.२ षटकांत १२५ धावा केल्या होत्या.

सीएसकेच्या फिरकीसमोर लखनौची दाणादाण, पावसामुळं खेळ थांबला

  • चेन्नई सुपरकिंग्जच्या रवींद्र जडेजा, महेश तिक्षणा, मोईन अली आणि मथीशा पथीराना यांनी भेदक गोलंदाजी करत लखनौच्या सात फलंदाजांना तंबूत पाठवलं आहे. १०.२ षटकानंतर लखनौचा स्कोर १२५ धावांवर पोहचला आहे. पाऊस सुरू झाल्यामुळं दुसऱ्यांदा खेळ थांबवण्यात आलं आहे.

जडेजा-तिक्षणा कहर, लखनौचे चार फलंदाज तंबूत

  • लखनौच्या खेळपट्टीवर फिरकीला चांगलीच साथ मिळत असल्यामुळे सीएसकेच्या फिरकीपटूंनी एलएसजीला एकामागून एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे. कायली मेयर्स, मनन वोहरा, कृणाल पांड्या आणि मार्कस स्टॉयनिस बाद झाले आहेत. सीएसकेच्या महेश तिक्षणाने दोन तर मोईन अली आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे. लखनौच्या आठ षठकांत ३९ धावा झाल्या आहे.

लखनौला पहिला झटका, पाच षटकात २५ धावा

  • लखनौच्या डावाची संथ सुरुवात झाली आहे. लखनौचा सलामीवीर कायली मेयर्स १४ धावांवर बाद झाला आहे. मोईन अलीने त्याची विकेट घेतली आहे. पहिली विकेट पडल्यानंतर मनन वोहरा आणि करन शर्मा खेळत आहे.

चेन्नईने टॉस जिंकला, लखनौची प्रथम फलंदाजी

  • सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता लखनौ सुपरजायंट्चे पहिल्यांदा फलंदाजी करणार आहे.

रिमझिम पावसामुळं टॉस लांबला

  • लखनौच्या मैदानावर रिमझिम पाऊस होत असल्यामुळं टॉस लांबला आहे. पाऊस थांबल्यानंतर काही मिनिटांनी टॉस होणार आहे. लखनौचा कर्णधार कृणाल पांड्या आणि सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी हे टॉस होण्यासाठी पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत.

लखनौची खेळपट्टी कशी असेल?

  • लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर लखनौ आणि चेन्नईत थोड्याच वेळात सामना होणार आहे. लखनौची खेळपट्टी संथ असल्यामुळं फलंदाजांना चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करणं कठीण होणार आहे. त्यामुळं आजचाही सामना लोव्ह स्कोरिंग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केएल राहुलच्या अनुपस्थित कृणालकडे लखनौचं नेतृत्व

  • आरसीबीविरुद्ध झालेल्या सामन्या फिल्डिंग करताना लखनौचा कर्णधार केएल राहुलला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर आता आजच्या सामन्यात तो खेळणार नाही. त्यामुळं लखनौ सुपरजायंट्चं कर्णधारपद कृणाल पांड्याकडे देण्यात आलं आहे.

लखनौची संभावित प्लेईंग ११ :

  • कृणाल पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, कायली मेयर्स, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन (विकेटकिपर), कृष्णप्पा गौथम, रवी बिश्नोई, अमित मिश्रा, नवीन-उल-हक, यश ठाकूर आणि आयुष बदोनी

चेन्नई सुपर किंग्जची संभावित प्लेईंग ११ :

  • महेंद्रसिंह धोनी (कर्णधार, विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉन्वे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे आणि महेश तिक्षणा

Whats_app_banner

संबंधित बातम्या