मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rajat Patidar IPL 2023 : आरसीबीसाठी आनंदाची बातमी, रजत पाटीदारवर शस्त्रक्रिया यशस्वी

Rajat Patidar IPL 2023 : आरसीबीसाठी आनंदाची बातमी, रजत पाटीदारवर शस्त्रक्रिया यशस्वी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 03, 2023 04:06 PM IST

Rajat Patidar Health Update : दुखापत झाल्यामुळं रजत पाटीदार आयपीएलमधून बाहेर झाला होता. परिणामी आरसीबीला मधल्या फळीतील फलंदाजीची चिंता सतावत आहे.

Rajat Patidar Health Update
Rajat Patidar Health Update (Rajat Patidar Instagram)

Rajat Patidar Health Update : लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करत प्लेऑफच्या दिशेने प्रवास करणाऱ्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा धडाकेबाज फलंदाज रजत पाटीदारवर शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या दुखापतीमुळं रजत पाटीदार आयपीएलमधून बाहेर झाला होता. त्यामुळं आता त्याच्यावर ऑपरेशन करण्यात आल्यानंतर तो कधीपर्यंत खेळण्यासाठी उपलब्ध होणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. रजत पाटीदारने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर करत याबाबतची माहिती दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

यंदाचा आयपीएल सुरू होण्यापूर्वीच रजत पाटीदार दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळं त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात येत होते. त्यानंतर रजत यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचं आरसीबीकडून सांगण्यात आलं होतं. प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात रजत पाटीदारच्या टाचेला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावरील सर्व उपचाराचा खर्च बीसीसीआयने उचलला आहे. रजतने शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा फोटो शेयर केल्यानंतर आरसीबीनेही त्याला शुभेच्छा देत लवकरात लवकर बरं होण्याची प्रार्थना केली आहे.

रजत पाटीदारने इन्स्टाग्रामवर फोटो शेयर करत म्हटलं आहे की, अलीकडेच माझ्यावर एक ऑपरेशन करण्यात आलं होतं. दुखापतीमुळं मी गेले काही दिवस त्रस्त होतो. परंतु आता माझ्यावर यशस्वी ऑपरेशन करण्यात आलं असून मी लवकरच क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे. सर्वांच्या शुभेंच्छा आणि प्रार्थनांबद्दल आभार मानतो, असं म्हणत रजत पाटीदारने क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.

 

WhatsApp channel