मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MS Dhoni Retirement : महेंद्रसिंह धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार?, रवींद्र जडेजाचा मोठा खुलासा

MS Dhoni Retirement : महेंद्रसिंह धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार?, रवींद्र जडेजाचा मोठा खुलासा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 04, 2023 05:04 PM IST

MS Dhoni IPL Retirement : महेंद्रसिंह धोनीसाठी यंदाचा आयपीएल हंगाम अखेरचा असणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच जडेजाने मोठा खुलासा केला आहे.

MS Dhoni IPL Retirement Update
MS Dhoni IPL Retirement Update (AP)

MS Dhoni IPL Retirement Update : गेल्या अनेक हंगामापासून चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा महेंद्रसिंह धोनी लवकरच आयपीएलमधूनही निवृत्त होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. धोनीने वनडे, ट्वेंटी आणि कसोटी क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यानंतर आता यंदाचा आयपीएल हंगाम धोनीसाठी अखेरचा असणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं आता या सर्व चर्चांवर ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने स्पष्टीकरण देत धोनीच्या निवृत्तीबाबतही मोठा खुलासा केला आहे. महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबतची माहिती फक्त धोनीच देऊ शकतो, असं म्हणत रवींद्र जडेजानं यंदाचा हंगाम संपल्यानंतर धोनी निवृत्त होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

स्टार स्पोर्ट्सच्या प्री-मॅच टॉक शो मध्ये बोलताना रवींद्र जडेजा म्हणाला की, महेंद्रसिंह धोनी हा चेन्नई सुपर किंग्ज संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. यंदा आणखी एक सीजन घेऊन तो सीएसकेसाठी खेळणार आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर धोनीला खेळताना पाहणं ही एक पर्वणीच असते. कोणत्या क्षणी काय करायला हवं, हे एमएस धोनीला चांगलं माहिती आहे. त्यामुळं त्याला निवृत्त कधी व्हायचं हे इतर कुणीही सांगू शकत नाही, असं रवींद्र जडेजा म्हणाला. त्यामुळं आता महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत अनेकांनी तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे.

महेंद्रसिंह धोनीनं काय करायला हवं, हे इतर खेळाडू किंवा सीएसके संघाचं मॅनेजमेंट त्याला सांगू शकत नाही. जर धोनीला पुढच्या आयपीएलच्या हंगामात खेळू वाटलं तर तो खेळू शकतो. याशिवाय त्याला निवृत्त व्हावं वाटलं तर तो निवृत्त होण्याचा निर्णय घेऊ शकतो. सर्वस्वी निर्णय हा महेंद्रसिंह धोनीचाच आहे, असं म्हणत रवींद्र जडेजाने धोनीच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध झालेल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने मार्क वुडच्या बॉलिंगवर लागोपाठ दोन षटकार लगावत तडाखेबंद खेळीची झलक दाखवली आहे. धोनीचा फिटनेस पाहता तो आयपीएलमधून लवकर निवृत्ती घेणार नाही, असा अंदाज अनेकांनी वर्तवला आहे.

WhatsApp channel