मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Neymar: नेमार आंतराष्ट्रीय फुटबॉल सोडणार? कोच टिटे यांचा राजीनामा

Neymar: नेमार आंतराष्ट्रीय फुटबॉल सोडणार? कोच टिटे यांचा राजीनामा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 10, 2022 05:42 PM IST

Neymar, FIFA World Cup 2022: क्वार्टर फायनल सामन्यात ब्राझीलचा क्रोएशियाकडून पेनल्टी शुटआऊटमध्ये पराभव झाला. यानंतर नेमार अतिशय निराश असून त्याने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. तर कोच टिटे यांनी आपल्या पदाचा राजीनाम दिला आहे.

Neymar
Neymar

Brazil vs Croatia Quarter-Final: ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमारने आंतरराष्ट्रीय फुटबॉल सोडण्याचे संकेत दिले आहेत. कतार येथे सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत शुक्रवारी (९ डिसेंबर) पराभूत झाल्यानंतर नेमार निराश झाला आहे. ब्राझीलचा पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाकडून पराभव झाला. तो पुन्हा राष्ट्रीय संघासाठी खेळेल की नाही याची शाश्वती देऊ शकत नाही, असे नेमारने सामन्यानंतर सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

भावूक झालेल्या नेमार म्हणाला की, "मी राष्ट्रीय संघाचे दरवाजे बंद करत नाही, पण मी परत येईन याची १०० टक्के हमीही देऊ शकत ​​नाही."

नेमार पुढे म्हणाला, "ही एक भयंकर भावना आहे. मला वाटते की गेल्या विश्वचषकापेक्षाही वाईट आहे. त्याचे वर्णन करण्यासाठी शब्द शोधणे कठीण आहे.आम्ही लढलो आणि मला माझ्या सहकाऱ्यांचा अभिमान आहे. त्यांनी स्पर्धेदरम्यान ज्या प्रकारचा खेळ दाखवला त्याचा मला अभिमान आहे.

पेले-ब्राझील संयुक्तरित्या नंबर वन

नेमारने सामन्यादरम्यान ब्राझीलसाठी एक गोल केला. यासह त्याने आपल्याच देशाच्या खेळाडूची बरोबरी केली. नेमारने पेले यांच्या ७७ आंतरराष्ट्रीय गोलांची बरोबरी केली आहे. ब्राझीलकडून सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत दोघेजण आता संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहेत.

या आधीच्या वर्ल्डकपमध्येदेखील क्वार्टर फायनलमध्ये पराभव

याआधीच्या २०१८ वर्ल्डकपमध्येही ब्राझीलचा क्वार्टर फायनलमध्ये पराभव झाला होता. त्यावेळी त्यांना बेल्जियमकडून पराभव पत्करावा लागला. त्याच वेळी, २०१४ मध्ये जर्मनीने सेमी फायनलमध्ये त्यांचा ७-१ ने पराभव केला. दरम्यान, दुखापतीमुळे नेमार त्या सामन्यात खेळला नव्हता.

कोच टिटे यांचा राजीनाम

दरम्यान, या पराभवानंतर ब्राझीलचे कोट टिटे यांनी पद सोडले आहे. "हा पराभव दुखद असून मी शांततेत निघत आहे, असे म्हणत टिटे यांनी कोचपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले.

WhatsApp channel

संबंधित बातम्या