मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 : धोनीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू

IPL 2023 : धोनीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 12, 2023 04:14 PM IST

Indian Premier League : राजस्थानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या नावावर अनोखा विक्रम होणार आहे.

Chennai: Chennai Super Kings captain MS Dhoni with teammates after winning the IPL 2023 cricket match against Lucknow Super Giants, at M. A. Chidambaram Stadium, in Chennai, Monday, April 3, 2023. Chennai won the match by 12 runs. (PTI Photo/R Senthil Kumar)(PTI04_03_2023_000365A)
Chennai: Chennai Super Kings captain MS Dhoni with teammates after winning the IPL 2023 cricket match against Lucknow Super Giants, at M. A. Chidambaram Stadium, in Chennai, Monday, April 3, 2023. Chennai won the match by 12 runs. (PTI Photo/R Senthil Kumar)(PTI04_03_2023_000365A) (PTI)

MS Dhoni 200th Match In Indian Premier League : भारताचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस खास ठरणार आहे. कारण महेंद्रसिंह धोनी आज राजस्थानविरुद्धच्या सामन्यात सामन्यांचं द्विशतक पूर्ण करणार आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना महेंद्रसिंह धोनी २०० सामने पूर्ण करणार आहे. अशी कामगिरी करणारा महेंद्रसिंह धोनी हा जगातील पहिलाच खेळाडू ठरणार आहे. त्यामुळं आता अनेकांनी महेंद्रसिंह धोनीला २०० व्या सामन्यासाठी शुभेच्छा देत त्याचं कौतुक करण्यास सुरुवात केली आहे. २००८ सालापासून महेंद्रसिंह धोनी आयपीएलमध्ये सीएसकेचं नेतृत्व करत आलेला आहे. याशिवाय पुणे वॉरियर्स या संघाचंही एमएस धोनीनं कर्णधारपद भूषवलं होतं.

ट्रेंडिंग न्यूज

आयपीएलची सुरुवात झाल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जने महेंद्रसिंह धोनीला खरेदी करत त्याच्याकडे संघाची धुरा सोपवली. त्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जने चार वेळा विजेतेपद आणि आयपीएलच्या जवळपास प्रत्येक हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं अनेकजण महेंद्रसिंह धोनीला ग्रेट कर्णधार मानतात. आयपीएलमध्ये एखाद्या संघासाठी सर्वात जास्त सामन्यांमध्ये नेतृत्व करण्याचा विक्रम हा महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होणार आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्जने २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ या सालामध्ये आयपीएलचा चषक जिंकला होता.

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा फायनल खेळण्याचा विक्रमही सीएसकेच्या नावावर आहे. हे सर्व विक्रम सीएसकेने फक्त महेंद्रसिंह धोनीच्याच नेतृत्वात केलेले आहेत. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने १९० सामन्यांत १२० विजय मिळवलेले आहेत. तर ७८ वेळा सीएसकेचा पराभव झाला आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्जच्या विजयाची टक्केवारी ६० इतकी राहिलेली आहे. त्यामुळं आता यंदाच्या आयपीएलमध्ये २०० व्या सामन्यात सीएसकेचं कर्णधारपद भूषवत असलेल्या धोनीसमोर राजस्थानला हरवण्याचं आव्हान असणार आहे.

WhatsApp channel