Accident: वयाच्या २४व्या वर्षी स्वप्नांचा चुराडा, विश्वविक्रम रचणाऱ्या खेळाडूचा अपघाती मृत्यू
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Accident: वयाच्या २४व्या वर्षी स्वप्नांचा चुराडा, विश्वविक्रम रचणाऱ्या खेळाडूचा अपघाती मृत्यू

Accident: वयाच्या २४व्या वर्षी स्वप्नांचा चुराडा, विश्वविक्रम रचणाऱ्या खेळाडूचा अपघाती मृत्यू

Feb 13, 2024 11:36 AM IST

Kelvin Kiptum dies in road accident: स्टार अ‍ॅथलेटिक्स केल्विन किप्टमचा कार अपघातात मृत्यू झाला आहे.

Kelvin Kiptum
Kelvin Kiptum

Kelvin Kiptum Dies by Road Accident: केनियाचा स्टार अ‍ॅथलेटिक्स केल्विन किप्टम आणि त्याच्या प्रशिक्षकाचा रविवारी रिफ्ट व्हॅलीमध्ये कार अपघातात मृत्यू झाला. या अपघातामुळे दोन तास आणि एका मिनिटापेक्षा कमी वेळेत एन्ड्युरन्स क्लासिक धावणाऱ्या एकमेव खेळाडूच्या कारकीर्दीचा अंत झाला. केल्विन किप्टम हा अवघ्या २४ वर्षांचा होता. केल्विन किप्टम यांची कार झाडाला आदळल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडली.

केल्विन किप्टम हा केनियाचा युवा स्टार खेळाडू होता. गेल्या काही वर्षात त्याने अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली. त्याने एलिट मॅरेथॉनमध्ये तीन वेळा जागतिक विक्रम केला. मागील वर्षी शिकागो मॅरेथॉनमध्ये त्याच्या विक्रमाला आंतरराष्ट्रीय ट्रॅक फेडरेशन वर्ल्ड ॲथलेटिक्सने गेल्या आठवड्यात मान्यता दिली होती. त्याच्या निधनाने संपूर्ण केनियाला धक्का बसला आहे. अवघ्या काही वर्षातच केल्विन किप्टमने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर संपूर्ण देशाचे लक्ष स्वत:कडे आकर्षित केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किप्टम आणि त्यांचे रवांडाचे प्रशिक्षक गेर्वाईस हकिझिमाना यांचा रात्री ११ वाजताच्या सुमारास अपघातात मृत्यू झाला. केनिया आणि जगभरातील सर्वोत्तम अंतर धावपटूंसाठी प्रशिक्षण केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या उच्च-उंचीच्या क्षेत्राच्या मध्यभागी, पश्चिम केनियामधील कपतागाट शहराजवळ हा अपघात घडला. केनियाचे राष्ट्रपती विल्यम रुटो यांनी एका निवेदनात किप्टोमला श्रद्धांजली वाहिली, "केल्विन हा अवघ्या २४ वर्षांचा होता. किप्टोम हे आपल्या देशाचे भविष्य होते."

Whats_app_banner
विभाग