मराठी बातम्या  /  क्रीडा  /  टीम इंडियाचा विजय पचला नाही, बांगलादेशी सनकी चाहत्यांची महिला खेळाडूंवर दगडफेक

टीम इंडियाचा विजय पचला नाही, बांगलादेशी सनकी चाहत्यांची महिला खेळाडूंवर दगडफेक

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 09, 2024 11:08 AM IST

Saff U19 Championship 2024 Final : भारत आणि बांगलादेश महिला संघातील SAFF अंडर-१९ महिला फुटबॉल चॅम्पियनशिपची फायनल १-१ अशी बरोबरी संपली. यानंतर सामना पेनल्टी शुटआऊटमध्ये गेला. पेनल्ट शुटआऊटमध्येही सामना बरोबरीत सुटला. यानंतर पंचांनी सामन्याचा निकाल टॉस करून लावण्याचा निर्णय घेतला.

India Vs Bangladesh Saff U19 Championship 2024 Final
India Vs Bangladesh Saff U19 Championship 2024 Final

India Vs Bangladesh, SAFF U19 Womens Championship : SAFF अंडर-१९ महिला फुटबॉल चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (८ फेब्रुवारी) भारत आणि बांगलादेश यांच्यात झाला. या सामन्यात भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले.

पण या सामन्यादरम्यान, बांगलादेशी चाहत्यांनी मैदानात धिंगाणा घातला. त्यांनी भारतीय महिला खेळाडूंवर पाण्याच्या बाटल्या आणि दगडफेक केली. यामुळे वातावरण तणावग्रस्त झाले होते.

नेमकं काय घडलं?s

वास्तविक, भारत आणि बांगलादेश महिला संघातील SAFF अंडर-१९ महिला फुटबॉल चॅम्पियनशिपची फायनल १-१ अशी बरोबरी संपली. यानंतर सामना पेनल्टी शुटआऊटमध्ये गेला. पेनल्ट शुटआऊटमध्येही सामना बरोबरीत सुटला.

पण यानंतर पंचांनी एक अजब निर्णय घेतला. त्यांनी सामन्याचा निकाल टॉस करून लावण्याचा निर्णय घेतला.

मात्र, नियमानुसार जोपर्यंत एखादा संघ गोल करण्यास चुकत नाही तोपर्यंत पेनल्ट शुटआऊट सुरू ठेवावा लागतो. पण पंचांनी असे केले नाही. त्यांनी टॉसच्या माध्यमातून सामन्याचा निकाल लावायचे ठरवले.

भारत जिंकल्याचे बांगलादेशी चाहत्यांना आवडलं नाही

टॉससाठी दोन्ही संघ तयार झाले. यानंतर टॉस झाला, टॉस भारताने जिंकला त्यामुळे भारताला विजेता घोषित करण्यात आले. पण यानंतर बांगलादेशी संघ आणि चाहते प्रचंड संतापले.

टॉसआधी बांगलादेशी संघ नाणेफेकसाठी तयार होता. पण निकाल त्यांच्या विरोधात गेल्याने त्यांनी यास विरोध करण्यास सुरुवात केला. बांगलादेशी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने रेफ्रीशी बाचाबाची झाली.

तर भारतीय संघाने विजयाचा जल्लोष सुरू केला. खेळाडू मैदानात धावू लागले. पण दुसरीकडे, बांगलादेश संघ पंचांशी वाद घालत राहिला आणि निर्णय बदलण्यासाठी दबाव टाकत राहिला.

बांगलादेशी महिला संघ मैदान सोडून जायला तयार नव्हता. तर बांगलादेशी प्रेक्षकांनीही मैदानात गोंधळ घालायला सुरूवात केली. त्यांनी घोषणाबाजी करत भारतीय महिला खेळाडूंच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या फेकल्या. तसेच, छोटे-छोटे दगड मारण्यास सुरुवात केली.

तासाभराहून अधिक काळ लोटल्यानंतर आणि सामना अधिकाऱ्यांनी भारत विजेता हा निकाल मागे घेतला आणि दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले.

WhatsApp channel

विभाग