मराठी बातम्या  /  क्रीडा  /  MS Dhoni : धोनी कायद्याच्या वर आहे का? ‘त्या’ कृतीवरुन दिग्गज अंपायरनं थालाला फटकारलं!
MS Dhoni CSK vs GT
MS Dhoni CSK vs GT

MS Dhoni : धोनी कायद्याच्या वर आहे का? ‘त्या’ कृतीवरुन दिग्गज अंपायरनं थालाला फटकारलं!

26 May 2023, 20:52 ISTRohit Bibhishan Jetnavare

MS Dhoni CSK vs GT : धोनीच्या सीएसकेला फायनलमध्ये पोहोचवण्यात एक २० वर्षीय गोलंदाजा सिंहाचा वाटा आहे. त्या गोलंदाजाचे नाव आहे, मथीषा पाथिराना. पाथिरानाने आयपीएल 2023 मध्ये ११ सामन्यांंत १७ बळी घेतले आहेत.

Daryl Harper on MS Dhoni CSK vs GT : चेन्नई सुपर किंग्स हा IPL 2023 च्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात मंगळवारी (२३ मे) चेन्नईने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव केला. या विजयानंतर सीएसकेने विक्रमी १०व्यांदा आयपीएलची फायनल गाठली.

ट्रेंडिंग न्यूज

धोनीच्या सीएसकेला फायनलमध्ये पोहोचवण्यात एक २० वर्षीय गोलंदाजा सिंहाचा वाटा आहे. त्या गोलंदाजाचे नाव आहे, मथीषा पाथिराना. पाथिरानाने आयपीएल 2023 मध्ये ११ सामन्यांंत १७ बळी घेतले आहेत.

मात्र, या सामन्यानंतर एमएस धोनी वादात सापडला आहे. मथीशा पाथिरानामुळे सामना ४ मिनिटांसाठी थांबवण्यात आला होता. यादरम्यान एमएस धोनी अंपायरशी वाद घालताना दिसला. आता, धोनीच्या या कृतीवर आयसीसीचे माजी अंपायर डॅरिल हार्पर यांनी सडकून टीका केली आहे. हार्पर यांनी एमएस धोनीचे हे कृत्य खेळाच्या भावनेविरुद्ध असल्याचे म्हटले आहे.

नेमकं काय घडलं?

खरंतर, गुजरात टायटन्स आणि CSK यांच्यातील क्वालिफायर 1 सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा झाला. यात मथिशा पाथिरानाचा समावेश होता. धोनीला डावातील १६ वे षटक मथिशा पाथिरानाकडून करवून घ्यायचे होते, परंतु मथीशा पाथिराना बराच काळ मैदानाबाहेर होता. त्यामुळे अंपायरने त्याला गोलंदाजी करण्यास मनाई केली.

पंचांनी सांगितले की, पाथीराना बराच वेळ मैदानाबाहेर होता आणि तो मैदानात येताच गोलंदाजी करू शकत नाही. यादरम्यान पंच आणि धोनी यांच्यात बराच वेळ संभाषण झाले आणि सामना ४ मिनिटांसाठी थांबवावा लागला. मात्र, शेवटी पंचांनी पाथीरानाला गोलंदाजी करण्यास परवानगी दिली. यावर धोनीने मुद्दाम वेळ वाया घालवला असे काही क्रिकेट एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे.

धोनीच्या कृतीवर डॅरेल हार्पर नाराज नाराज

या प्रकरणानंतर माजी आयसीसी अंपायर डॅरिल हार्पर यांनी एमएस धोनीवर टीका करणारे विधान केले. ते म्हणाले की, त्यावेळी नक्कीच एमएस धोनीने त्याच्या आवडत्या गोलंदाजाची षटके पूर्ण करवून घेण्यासाठी वेळ वाया घालवला. असे करून धोनीने खेळभावनेचा अनादर केला असल्याचे हार्पर यांनी म्हटले.

माजी पंच पुढे म्हणाले की, “धोनीने क्रिकेटच्या भावनेचा तसेच पंचांच्या सूचनांचा अनादर केला. त्याला हवे असते तर तो दुसऱ्या कोणाला तरी गोलंदाजी देऊ शकला असता, पण त्याने तसे केले नाही. कदाचित काही लोक कायद्याच्या वर आहेत. काही लोक जिंकण्यासाठी काहीही करतील असे दृष्य नेहमीच निराशाजनक असते".