मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Akash Madhwal Bowling : आकाश मढवलालवर लोकल टुर्नामेंट खेळण्यास बंदी, भाऊ आशीषनं केला खुलासा
akash madhwal bowling
akash madhwal bowling

Akash Madhwal Bowling : आकाश मढवलालवर लोकल टुर्नामेंट खेळण्यास बंदी, भाऊ आशीषनं केला खुलासा

26 May 2023, 18:09 ISTRohit Bibhishan Jetnavare

Akash Madhwal IPL 2023 : आकाश मढवालचा भाऊ आशिष पुढे म्हणाला की, आकाशला मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माकडून खूप मदत मिळाली. रोहित भाईची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो खेळाडूंना संधी देतो.

Akash Madhwal IPL 2023 : मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज आकाश मढवालने आपल्या कामगिरीने सर्वांनाच खूप प्रभावित केले आहे. आकाशने लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सादर केला. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आकाश मढवालने अवघ्या ५ धावा देत ५ खेळाडूंना आपली शिकार बनवले. या शानदार कामगिरीनंतर आकाश मधवाल चर्चेचा विषय बनला आहे. त्याचवेळी आता आकाश मढवालचा भाऊ आशिष मढवालने एक मोठा खुलासा केला आहे. सोबतच त्याने मुंबईचा कॅप्टन रोहित शर्माचे तोंडभरून कौतुक केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

गोलंदाजीच्या धाकानं लोकल टुर्नामेंट खेळण्यास बंदी

आशिष मढवालने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आकाश मढवालला त्याच्या गावी स्थानिक क्रिकेट टुर्नामेंटमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. वास्तविक, आकाश मढवालच्या गावातील क्रिकेटपटूंचे म्हणणे आहे की, आता आकाशची गोलंदाजी खेळणे सोपे नाही'.

रोहित शर्माचं कौतुक

आकाश मढवालचा भाऊ आशिष पुढे म्हणाला की, आकाशला मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माकडून खूप मदत मिळाली. रोहित भाईची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो खेळाडूंना संधी देतो. तो आपल्या खेळाडूंवर विश्वास ठेवतो आणि त्यांना पाठिंबा देतो.

प्रत्येकी खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधील आपल्या स्थानाबद्दल नेहमीच भीती वाटत असते, पण रोहित शर्माने ज्या प्रकारे आकाशवर विश्वास दाखवला तो आता कामी येत आहे. पूर्वी लोक आकाशला म्हणायचे की तू माझ्या संघासाठी खेळ, त्याऐवजी आम्ही तुला पैसे देऊ. उत्तराखंडसाठी ट्रायल दिल्यानंतर आकाशने लेदर बॉलने क्रिकेट खेळायला सुरुवात केली", असेही आशिष मढवालने सांगितले.

विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज आकाश मधवालने त्याच्या वेग आणि विकेट घेण्याच्या क्षमतेने खूप प्रभावित केले आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात आकाश मधवालने ४ बळी घेतले. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात आकाश मधवालने ५ धावा देत ५ खेळाडूंना आपला बळी बनवले.