मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 : धोनी बेबी मलिंगाच्या बहिणीला काय म्हणाला? पाथिराना फॅमिलीचा आनंद गगनात मावेना! पाहाच
ms dhoni meets matheesha pathirana family
ms dhoni meets matheesha pathirana family

IPL 2023 : धोनी बेबी मलिंगाच्या बहिणीला काय म्हणाला? पाथिराना फॅमिलीचा आनंद गगनात मावेना! पाहाच

26 May 2023, 18:38 ISTRohit Bibhishan Jetnavare

ms dhoni meets matheesha pathirana family : आयपीएलच्या या मोसमात धोनीने पाथीरानाचा उत्तम वापर केला. संघाला जेव्हा जेव्हा विकेटची गरज भासली तेव्हा या युवा गोलंदाजाने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने संघाला मदत केली.

matheesha pathirana sister vishuka pathirana with ms dhoni : चेन्नई सुपर किंग्स हा IPL 2023 च्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात मंगळवारी (२३ मे) चेन्नईने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव केला. या विजयानंतर सीएसकेने विक्रमी १०व्यांदा आयपीएलची फायनल गाठली. धोनीच्या सीएसकेला फायनलमध्ये पोहोचवण्यात एक २० वर्षीय गोलंदाजा सिंहाचा वाटा आहे. त्या गोलंदाजाचे नाव आहे, मथीषा पाथिराना. पाथिरानाने आयपीएल 2023 मध्ये ११ सामन्यांंत १७ बळी घेतले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, आयपीएल फायनलसाठी मथिषा पाथिरानाचे कुटूंब भारतात आले आहे. पाथिरानाच्या संपुर्ण कुटुंबाने सीएसकेचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीची भेट घेतली. या भेटीचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले आहेत.

पाथीरानाच्या कुटुंबीयांनी घेतली धोनीची भेट

IPL 2023 च्या फायनलमध्ये पोहोचल्यानंतर पाथिरानाच्या कुटुंबियांनी एमएस धोनीची भेट घेतली. पाथीरानाची बहीण विशुका पाथिराना हिने या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो पोस्ट करत तिने लिहिले की, “आता आम्हाला खात्री आहे की मल्ली सुरक्षित हातात आहे. थालाने मला सांगितले आहे की, 'तुला मथिशाबद्दल काळजी करण्याची गरज नाही, मी नेहमीच त्याच्यासोबत आहे'. हे क्षण माझ्यासाठी स्वप्नासारखे होते.”

मथिशा पाथिराना 'बेबी मलिंगा' या नावाने प्रसिद्ध आहे. त्याची गोलंदाजीची अॅक्शन श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगासारखी आहे. एमएस धोनी आणि ड्वेन ब्राव्हो यांच्या मार्गदर्शनाखाली पाथीरानाने चेन्नईसाठी या मोसमात शानदार गोलंदाजी केली आहे.

आयपीएलच्या या मोसमात धोनीने पाथीरानाचा उत्तम वापर केला. संघाला जेव्हा जेव्हा विकेटची गरज भासली तेव्हा या युवा गोलंदाजाने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने संघाला मदत केली.

मुंबईविरुद्ध शानदार गोलंदाजी

गतवर्षी चेन्नई संघात सामील झालेल्या मथिषा पाथिरानाने डेथ ओव्हर्समध्ये शानदार गोलंदाजी केली. या मोसमात त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध आपली सर्वोत्तम कामगिरी केली. त्या सामन्यात त्याने चार षटकात १५ धावा देत ३ बळी घेतले. या चमकदार कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा खिताबही देण्यात आला.