मराठी बातम्या  /  क्रीडा  /  DC vs GT IPL 2023 : ऋषभ पंतच्या हजेरीमुळं दिल्ली जोमात, गुजरातची धाकधूक वाढली

DC vs GT IPL 2023 : ऋषभ पंतच्या हजेरीमुळं दिल्ली जोमात, गुजरातची धाकधूक वाढली

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 04, 2023 06:10 PM IST

DC vs GT IPL 2023 Live Scorecard : दक्षिण आफ्रिकेचे तीन खेळाडू विशेष विमानानं दिल्लीत पोहचले आहे. त्यामुळं आता गुजरातची धाकधूक वाढली आहे.

Delhi Capitals vs Gujarat Titans Match Live Score
Delhi Capitals vs Gujarat Titans Match Live Score (IPL Twitter)

Delhi Capitals vs Gujarat Titans Match Live Score : डेव्हिड वॉर्नरची दिल्ली कॅपिटल्स आज गतविजेच्या गुजरात टायटन्सशी भिडणार आहे. लखनौकडून पराभवाचं तोंड पाहावं लागल्यानंतर गुजरातला नमवून आयपीएलमधील पहिला विजय साजरा करण्याचा प्रयत्न दिल्लीचा संघ करणार आहे. तर दुसरीकडे गुजरात टायटन्सचे सर्वच फलंदाज आणि गोलंदाज चांगल्याच फॉर्मात आहे. त्यामुळं आज संध्याकाळी रंगणाऱ्या सामन्यात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. परंतु आता सामना सुरू होण्यासाठी थोडाच वेळ बाकी असतानाच दिल्लीसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण कार अपघातामुळं दुखापतग्रस्त असणारा ऋषभ पंत आजच्या सामन्याला हजेरी लावणार आहे. त्यामुळं आता दिल्लीचा कर्णधार डगआऊटमध्ये उपस्थित राहणार असल्यामुळं दिल्लीचं मनोबल वाढलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दिल्लीनं खरेदी केलेले दक्षिण आफ्रिकेचे तीन खेळाडू आज विशेष विमानानं दिल्लीत पोहचले आहे. त्यात डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी आणि एनरिक नॉर्किया यांचा समावेश आहे. मिलर आणि पंत वगळता दोन्ही खेळाडू आजच्या सामन्या खेळण्याची शक्यता असल्यामुळं हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स संघाची धाकधूक वाढली आहे. सीएसके प्रमाणेच दिल्लीचा संघ तब्बल चार वर्षांनंतर घरच्या मैदानावर पहिलाच सामना खेळणार आहे. त्यामुळं आजची मॅच दिल्लीसाठी फार महत्त्वाची असणार आहे.

गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात दिल्लीच्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी कर्णधार ऋषभ पंत मैदानावर हजेरी लावणार आहे. रुडकी नजीक झालेल्या कार अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. त्यामुळं तो अनेक महिन्यांपासून क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळं आता तो परतल्यामुळं दिल्ली कॅपिटल्सचा आत्मविश्वास वाढणार आहे. याशिवाय आफ्रिकेचा डावखुरा तडाखेबंद खेळाडू डेव्हिड मिलर हा देखील पुढच्या सामन्यापासून खेळण्यासाठी उपलब्ध असणार आहे.

WhatsApp channel