मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ronaldo & Al Nassr: रोनाल्डो इफेक्ट! ८ लाखांचे ५० लाख झाले, अल नासरसोबत हे काय घडलं? पाहा

Ronaldo & Al Nassr: रोनाल्डो इफेक्ट! ८ लाखांचे ५० लाख झाले, अल नासरसोबत हे काय घडलं? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 02, 2023 03:15 PM IST

Saudi club Al-Nassr social media Followers- Cristiano Ronaldo: रोनाल्डो हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे आणि त्याच्या लोकप्रियतेचा फायदा अल नासरला आता मिळत आहे. रोनाल्डोसोबत करार केल्यानंतर अल नासरचे फॉलोअर्स झपाट्याने वाढले आहेत.

Ronaldo & Al Nassr
Ronaldo & Al Nassr

Cristiano Ronaldo signs Saudi club Al-Nassr: फुटबॉलचा सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डोने सौदी अरेबियाचा फुटबॉल क्लब अल नासरसोबत करार केला आहे. या कराराचा अल नासरला मोठा फायदा झाला आहे. अल नासर हा क्लब वेगाने लोकप्रिय झाला आहे. अवघ्या २४ तासात सोशल मीडियावर अल नासरचे फॉलोअर्स अनेक पटींनी वाढले आहेत. रोनाल्डोसोबतचा करार जाहीर होण्यापूर्वी अल नासरचे फॉलोअर्स साडेआठ लाखांच्या जवळपास होते. आता ही संख्या ५० लाखांच्या पुढे गेली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

३७ वर्षीय रोनाल्डोने अल नासरसोबत अडीच वर्षांचा करार केला आहे. तो २०२५ पर्यंत या क्लबसाठी खेळणार आहे. या दरम्यान त्याचा पगार २०० मिलियन युरो (सुमारे १७०० कोटी रुपये) असेल. रोनाल्डो प्रथमच आशियाई क्लबकडून खेळणार आहे. याआधी त्याने जवळपास एक दशक युरोपियन क्लब फुटबॉलवर राज्य केले आहे.

फिफा विश्वचषक २०२२ रोनाल्डोसाठी दुःखद स्वप्न

कतारने नुकताच आयोजित केलेला फिफा विश्वचषक २०२२ हा रोनाल्डो आणि त्याचा संघ पोर्तुगालसाठी दुःखद स्वप्नापेक्षा कमी नव्हता. पोर्तुगालला उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोने १-० ने पराभूत केले. या स्पर्धेत रोनाल्डोला केवळ एकच गोल करता आला. बाद फेरीत त्याला स्टार्टिंग ११ मध्येही स्थान मिळाले नव्हते.

रोनाल्डो हा व्यावसायिक फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. रोनाल्डोने यावर्षी जोसेफ बीकनला (८०५ गोल) मागे टाकले होते. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही रोनाल्डोच्या नावावर आहे. रोनाल्डोने पोर्तुगालसाठी आतापर्यंत १९६ सामन्यांत ११८ गोल केले आहेत.

WhatsApp channel