मराठी बातम्या  /  क्रीडा  /  DC vs MI : मुंबईविरुद्ध ५४ धावांची तुफानी खेळी करूनही अक्षर पटेल निराश, म्हणाला...

DC vs MI : मुंबईविरुद्ध ५४ धावांची तुफानी खेळी करूनही अक्षर पटेल निराश, म्हणाला...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 12, 2023 04:41 PM IST

DC vs MI IPL 2023 : आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सला सलग चार सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानं अक्षर पटेलने निराशा व्यक्त केली आहे.

Delhi Capitals batter Axar Patel
Delhi Capitals batter Axar Patel (PTI)

DC vs MI IPL 2023 : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सला सलग चार सामन्यांमध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. दिल्लीच्या खेळाडूंनी फलंदाजी आणि गोलंदाजीत केलेल्या सुमार कामगिरीचा फटका संघाला बसला आहे. मुंबईविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला अखेरच्या चेंडूवर पराभव स्वीकारावा लागला. याच सामन्यात दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने ५१ धावांची झुंजार खेळी केली. त्यात त्याने पाच उत्तुंग षटकार ठोकले. परंतु तरीही पदरात काहीच न पडल्यामुळं अक्षर पटेलने नाराजी व्यक्त केली आहे. चांगली सुरुवात होऊनही आमचा संघ लय कायम ठेवू शकला नाही तर पुढे स्थिती आणखी खराब होऊ शकते, असं अक्षर पटेलने म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबई इंडियन्सविरुद्ध दिल्लीचा अखेरच्या चेंडूवर पराभव झाल्यानंतर बोलताना अक्षर पटेल म्हणाला की, या सामन्यात माझ्याकडूनही चूक झालेली आहे. सामन्याचे १० चेंडू बाकी असताना मी बाद झालो. मी खेळपट्टीवर असतो तर आणखी धावा करता आल्या असत्या. मी चांगल्या लयीत खेळत होतो, ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला तर गोलंदाज दबावात येईल, असं मला वाटलं होतं. परंतु मी पहिल्याच चेंडूवर बाद झालो, असं म्हणत अक्षर पटेलने निराशा व्यक्त केली आहे. याशिवाय दिल्लीच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं तितकं सोप्पं नव्हतं, असंही अक्षरने म्हटलं आहे.

दिल्लीच्या खेळपट्टीवर पव्हेलियनमधून येताच फटकेबाजी करणं सोप्पं नव्हतं. तरीदेखील आम्ही चौकार आणि षटकार मारण्याचा प्रयत्न करत होतो. याशिवाय एकेरी आणि दुहेरी धावा घेण्यावरही आम्ही भर दिल्याचं अक्षर म्हणाला. मुंबईविरुद्ध जर आम्ही १८० धावा केल्या असत्या तर कदाचित सामन्याचा निकाल काहीसा वेगळा असता, असंही अक्षर पटेलने म्हटलं आहे. आता आयपीएलमध्ये आम्ही चार सामने गमावले आहे, याशिवाय आमचा रनरेटही खराब आहे. त्यामुळं असाच विचार करत आम्ही पुढे गेलो तर स्थिती आणखी बिघडू शकते, त्यामुळं सकारात्मक विचार करत आम्ही पुढच्या सामन्यांमध्ये कामगिरी करणार असल्याचं अक्षर पटेलने म्हटलं आहे.

WhatsApp channel