मराठी बातम्या  /  धर्म  /  Remedies of Rice : तांदळाचे हे उपाय केल्याने तुमची तिजोरी भरून जाईल, पितृदोषापासूनही सुटका मिळेल

Remedies of Rice : तांदळाचे हे उपाय केल्याने तुमची तिजोरी भरून जाईल, पितृदोषापासूनही सुटका मिळेल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 04, 2024 09:23 PM IST

Remedies of Rice : ज्योतिषशास्त्रानुसार अक्षत हे चंद्राचे रूप मानले जाते. त्यामुळेच पूजेच्या वेळी परमेश्वराला अखंड स्वरूपात तांदूळ अर्पण केला जातो.

Remedies of Rice
Remedies of Rice

हिंदू धर्मात तांदूळ खूप शुभ मानले जाते. त्यामुळे तांदळाचा वापर सर्व प्रकारच्या पूजेसाठी केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार अक्षत हे चंद्राचे रूप मानले जाते. त्यामुळेच पूजेच्या वेळी परमेश्वराला अखंड स्वरूपात तांदूळ अर्पण केला जातो.

दरम्यान, ज्योतिष शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, या उपायांचे पालन केल्याने व्यक्तीचे नशीब रातोरात बदलू शकते आणि अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. चला तर मग अशाचा काही तांदळाशी संबंधित काही उपाय जाणून घेऊया.

तांदळाचे उपाय

१) नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित समस्या असल्यास गोड भात तयार करून कावळ्यांना खाऊ घाला. असे मानले जाते, की हा उपाय केल्याने नोकरी आणि व्यवसायात यश मिळते.

२) ज्योतिष शास्त्रानुसार धन मिळविण्यासाठी तांदळाचे २१ दाणे लाल कपड्यात बांधून पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा. असे केल्याने धनाची प्राप्ती होते, अशी मान्यता आहे.

३) जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर तांदळात तीळ आणि दूध मिसळा आणि हवन करा आणि देवी लक्ष्मीची पूजा योग्य प्रकारे करा. असे मानले जाते की हा चमत्कारिक उपाय केल्याने आर्थिक संकट दूर होते.

४) असे मानले जाते, की पितृ दोषामुळे व्यक्तीचे जीवन नेहमी समस्यांनी भरलेले असते. अशा स्थितीत माणसाला कामात यश मिळत नाही. जर तुम्हालाही पितृदोषाचा सामना करावा लागत असेल तर अमावस्येच्या दिवशी खीर बनवा आणि त्यात भाकरी मिसळा आणि कावळ्यांना खाऊ घाला. हा उपाय केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते.

५) काळ्या तांदळाचा उपाय मानवांसाठी फायदेशीर मानला जातो. जर तुम्हाला कोणताही आजार असेल तर सोमवारी शिवलिंगावर काळ्या तांदळात दूध मिसळून अर्पण करा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने शारिरीक आणि मानसिक रोगांपासून मुक्ती मिळते.

 

 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग