Shattila Ekadashi Upay : माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षटतिला एकादशीचे व्रत केले जाते. या दिवशी विधीनुसार भगवान विष्णूची उपासना आणि उपवास केला जातो. असे केल्यास भक्तांना इच्छित फळ मिळते.
षटतिला एकादशीच्या दिवशी जो भक्त भगवान विष्णूला तीळ अर्पण करतो, तिळाचे दान करतो आणि स्वतः तीळ सेवन करतो, त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. यंदा षटतिला एकादशीचे व्रत ६ फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी पाळले जाणार आहे.
हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला षटतिला एकादशीचा सण साजरा केला जातो. यानुसार षटतिला एकादशी तिथी महिन्यात ५ तारखेला संध्याकाळी ५ वाजून २४ मिनिटांनी सुरू होईल. तर ६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ वाजून ७ मिनिटांनी संपेल. उदयातिथीनुसार ६ फेब्रुवारीला षटतिला एकादशी साजरी होणार आहे.
षटतिला एकादशीचीच्या दिवशी सकाळी लवकर स्नानानंतर भगवान विष्णूची पूजा करून त्यांना फुले, धूप इत्यादी अर्पण करा. दिवसभर व्रत पाळल्यानंतर रात्री भगवान विष्णूची पूजा करावी आणि रात्री जागरण आणि हवन देखील करावे. यानंतर द्वादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूला भोजन अर्पण करावे आणि पंडितांना भोजन दिल्यानंतर स्वतः भोजन करावे.
१) षटतिला एकादशीला तिळाचे दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. तिळापासून बनवलेल्या वस्तूही तुम्ही दान करू शकता.
२) षटतिला एकादशीला श्री हरी भगवान विष्णूला तीळ अर्पण करणे शुभ मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूला तीळ अर्पण केल्याने मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते, अशी मान्यता आहे.
३) षटतिला एकादशीचे व्रत करण्याचा संकल्प घेणाऱ्या व्यक्तीने तिळाचे उटणे लावावे आणि पाण्यात तीळ टाकून आंघोळ करावी.
४) षटतिला एकादशीच्या व्रताची कथा ऐकल्यानंतर तीळ अर्पण केल्याने आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळतो.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या