मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : मोक्षप्राप्तीसाठी तरुणानं स्वत:ला जमिनीत घेतलं गाडून; अवस्था पाहून पोलिसही चक्रावले

Viral News : मोक्षप्राप्तीसाठी तरुणानं स्वत:ला जमिनीत घेतलं गाडून; अवस्था पाहून पोलिसही चक्रावले

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 28, 2022 08:43 AM IST

Unnao Crime News : तरुणानं मोक्षप्राप्तीसाठी सहा फूटांचा खड्डा खणून त्यात स्वत:ला गाडून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं घटनेचा तपास करण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही धक्का बसला.

Unnao UP Crime News
Unnao UP Crime News (HT)

Unnao UP Crime News : मोक्षप्राप्तीसाठी एका तरुणानं पुजाऱ्यांच्या सहाय्यानं सहा फूटांचा खोल खड्डा करून त्यात स्वत:ला गाडून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशच्या उन्नावमधून समोर आला आहे. त्यामुळं खळबळ उडाली असून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तरुणाला बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. एका तरुणानं मोक्षप्राप्तीसाठी उचललेल्या केलेल्या या धक्कादायक कृतीनंतर आता यावर अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यूपीतील उन्नाव जिल्ह्यामध्ये एका २२ वर्षीय तरुण साधूनं मंदिरातील पुजाऱ्यांच्या मदतीनं स्वत:ला जमिनीत गाडून घेतलं होतं. मोक्षप्राप्तीसाठी तरुणानं हा सारा प्रकार केल्याचं काही लोकांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्या खड्ड्यातून तरुणाला जिवंत बाहेर काढलं. मंदिराच्या परिसरातच ही घटना घडल्यानं यूपीत खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मंदिरात पूजा-अर्चना करणाऱ्या चार पुजाऱ्यांनी आपल्या शिष्याला मोक्ष मिळवून देण्याचं ठरवलं. त्यावेळी तरुण साधूनं त्यास नकार दिला नाही. त्यानंतर चारही साधूंनी मंदिर परिसरात सहा फूटांचा एक खोल खड्डा केला. त्यात तरुण साधूला गाडून वरून माती टाकून देण्यात आली. जवळपास सात मिनिटं तरुण साधू हा जमिनीखाली होती. पोलिसांनी तात्काळ धाव घेत त्याला बाहेर काढल्यानं त्याचा जीव वाचला आहे. घडलेला हा सारा प्रकार पाहून पोलिसांचाही जीव काही वेळ भांड्यात पडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील चारही आरोपी पुजारींना अटक करण्यात आली असून अंधश्रद्धेतून हा प्रकार घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. याशिवाय तरुण हा सुखरुप असून त्याला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

IPL_Entry_Point

विभाग