मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Saraswati : सरस्वतीनं शिकवलं नाही तर पूजा कशासाठी?, भुजबळांच्या वक्तव्यावर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप

Saraswati : सरस्वतीनं शिकवलं नाही तर पूजा कशासाठी?, भुजबळांच्या वक्तव्यावर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 27, 2022 03:25 PM IST

Chhagan bhujbal vs brahmin mahasangh : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वतीविषयी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता त्यावर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप घेतला आहे.

Chhagan bhujbal controversial statement On Saraswati
Chhagan bhujbal controversial statement On Saraswati (HT)

Chhagan bhujbal controversial statement On Saraswati : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी माता सरस्वतींविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं वाद पेटला आहे. कारण आता त्यांनी सरस्वतींविषयी केलेल्या वक्तव्यावर ब्राह्मण महासंघानं आक्षेप घेतला असून यावरून आता राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या

कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले होते की, ज्या सरस्वतीनं आम्हाला शिकवलंच नाही तर मग शाळेत सरस्वतीची पूजा कशासाठी करायची? असा सवाल करत छगन भुजबळ यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता त्यावर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आक्षेप घेतला आहे.

देवी सरस्वतीला कुणी पाहिलं का? आणि जर पाहिलं असेल तर या देवीनं केवळ तीन टक्के लोकांना शिकवलं. त्यामुळं शाळेत सरस्वतीचा फोटो कशासाठी हवाय?, त्याजागी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावायला हवे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली होती. आता त्यांच्या या विधानांवर ब्राम्हण महासंघानं आक्षेप घेतला आहे.

याबाबत बोलताना आनंद दवे म्हणाले की, फुले दाम्पत्याचे फोटो शाळेत असायलाच हवेत. परंतु सरस्वती माता आणि शारदा मातांच्या फोटोला छगन भुजबळांचा विरोध का आहे?, सरस्वती किंवा शारदा मातेला कुणीही पाहिलेलं नाही. मग आता गणरायाचेही फोटो नाकारणार आहात का? त्यामुळं छगन भुजबळांनी त्यांच्या या वक्तव्यांवरून हिंदूंची माफी मागावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे.

IPL_Entry_Point