मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Vegetarian Crocodile : जगातील पहिल्या शाकाहारी मगरीचा मृत्यू; लोकांनी अंत्ययात्रा काढून केला दफनविधी

Vegetarian Crocodile : जगातील पहिल्या शाकाहारी मगरीचा मृत्यू; लोकांनी अंत्ययात्रा काढून केला दफनविधी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 11, 2022 10:17 AM IST

Vegetarian Crocodile In Kerala : जगातली पहिली शाकाहारी मगर प्रसाद, तांदूळ आणि गूळ खायची. त्याचबरोबर दिवसातून दोनदा देवाचं दर्शन घेण्यासाठी ती मंदिरातही यायची.

Vegetarian Crocodile In Kerala
Vegetarian Crocodile In Kerala (HT)

Vegetarian Crocodile In Kerala : गेल्या अनेक वर्षांपासून मांसाहार न करता केवळ शाकाहार करून उदरनिर्वाह करणाऱ्या जगातील पहिल्या शाकाहारी मगरीचं निधन झालं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मगर केरळच्या कसरगोड जिह्यातल्या श्री अनंत पद्यनाभस्वामी मंदिरातील तलावात राहत होती. त्यामुळं आता या मगरीच्या निधनामुळं हळहळ व्यक्त केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मांसाहार नाही तर शाकाहार करायची मगर...

गेल्या अनेक वर्षांपासून पद्यनाभस्वामी मंदिरातील परिसरात राहणारी ही मगर कोणताही मांसाहार न करता प्रसाद, तांदूळ आणि गूळ खात होती. अनेकदा मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक या मगरीला हातानं प्रसाद आणि इतर शाकाहारी पदार्थ खाऊ घालत होते. याशिवाय ही शाकाहारी मगर दिवसातून दोन ते तीन वेळा मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत होती. त्यामुळं माणसांची खास दोस्ती केलेल्या आणि मांसाहार नाकारून शाकाहार स्वीकारलेल्या मगरीचं निधन झाल्यानं भाविकांमध्ये शोककळा पसरली आहे.

मगरीनं आतापर्यंत कुणावरही हल्ला केला नव्हता...

गेल्या अनेक वर्षांपासून ही मगर मंदिर परिसरात राहत असल्यानं लोक मगरीला पाहून घाबरायचे. याशिवाय अनेक लोकांनी तिला हातानं पदार्थ खाऊ घातले होते. परंतु या मगरीनं कधीही कुणावर जीवघेणा हल्ला केलेला नाही, असं पद्यनाभस्वामी मंदिरातील पुजाऱ्यांनी सांगितलं.

लोकांनी अंत्ययात्रा काढून केला दफनविधी...

जगातील पहिल्या शाकाहारी मगरीचं निधन झाल्यानंतर मंदिर प्रशासन आणि भाविकांनी तिची अंत्ययात्रा काढून दफनविधी केला आहे. त्यामुळं आता या मगरीचं निधन झाल्यानं केरळातील भाविकांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग