मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयकाबाबत मल्लिकार्जुन खरगेंचा संसदेत मोठा दावा

Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयकाबाबत मल्लिकार्जुन खरगेंचा संसदेत मोठा दावा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 19, 2023 06:15 PM IST

Mallikarjun kharge : हिला आरक्षण विधेयक हेयुपीए सरकारच्या काळात २०१० मध्येच पास करण्यात आलं होतं. त्यामुळे हे विधेयक आमचेच असल्याचा दावाविरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत केला आहे.

मल्लिकार्जुन खर्गे
मल्लिकार्जुन खर्गे

महिला आरक्षण विधेयक संसदेत सादर केल्यानंतर आता काँग्रेस व भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. महिला आरक्षण विधेयक हे युपीए सरकारच्या काळात २०१० मध्येच पास करण्यात आलं होतं. पण काही अडचणींमुळे त्या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होऊ शकलं नाही, त्यामुळे महिला आरक्षण विधेयक हे आमचेच असल्याचा दावा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत केला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१९ सप्टेंबर) नव्या संसदेत महिला आरक्षण विधेयक लोकसभेत  सादर केलं आहे. ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ (महिला आरक्षण विधेयक) असे याला नाव देण्यात आले असून उद्या यावर मतदान घेण्यात येणार आहे. १९९६ मध्ये हे विधेयक पहिल्यांदा संसदेच्या पटलावर आलं. गेल्या अनेक वर्षांपासून देशात महिला आरक्षणाविषयी खूप चर्चा झाली,  हे विधेयक पास करून कायदा बनवण्याचे अनेक प्रयत्न झाले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात अनेकदा हे विधेयक सादर करण्यात आलं. परंतु, ते मंजूर करून कायदा करण्यासाठी पुरेसं संख्याबळ त्यांच्याकडे नव्हतं. त्यामुळे आपलं स्वप्न अपूर्ण राहिलं, अशी भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली.

या विधेयकावर बोलताना मल्लिकार्जुन खर्गे राज्यसभेत पंतप्रधान मोदींचा भारताचे पहिले पंतप्रधान असा उपरोधिक उल्लेख केला. खर्गे म्हणाले की, पंतप्रधानांनी दोन-तीन भाषणं झाली. जुन्या संसदेत पहिलं भाषणं झालं. दुसरं भाषण सेंट्रल हॉलमध्ये झालं आणि आता राज्यसभेत झालं. त्यांनी महिला आरक्षण विधेयकासाठी आम्हाला काहीही श्रेय दिलं नाही. पण मी त्यांच्या निदर्शनास आणू इच्छितो की, आम्ही २०१० मध्येच महिला आरक्षण विधेयक पास केलं होतं. पण काही अडचणी आल्याने ते विधेयक कायद्यात रुपांतरीत झाले नाही.

खर्गे म्हणाले की, त्यावेळी महिलांच्या आधी मागासवर्गीय घटकाला आरक्षण देण्याची गरज होती. अनुसूचित जातींना आरक्षण देणं सोपी गोष्ट होती, कारण त्यांना आधीपासून संविधानिक आरक्षण दिलं होतं. पण मागासवर्गीयांमध्ये महिला जास्त शिकलेल्या नाहीत. त्यांची साक्षरता कमी आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांची एक सवय आहे की, ते कमजोर महिलांना प्रतिनिधित्व देतात. जी सक्षम आहे आणि लढू शकते, अशा महिलांना स्थान दिलं जात नाही. कमजोर वर्गातील लोकांना पक्षात तोंड उघडायचं नाही, असं सांगून नेहमी तिकीट दिलं जातं. हे सर्वच राजकीय पक्षांत घडतं. यामुळे महिला वर्ग मागे आहे. तुम्ही त्यांना बोलू देत नाहीत. त्यांना तुम्ही कधीही पुढे जाऊ देत नाहीत,” असंही मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.

IPL_Entry_Point