मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  नोबेल विजेते अमर्त्य सेन यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप?, विश्वभारती विद्यापीठानं बजावली नोटीस

नोबेल विजेते अमर्त्य सेन यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप?, विश्वभारती विद्यापीठानं बजावली नोटीस

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 22, 2023 03:01 PM IST

Amartya Sen Land Scam : नोबेल विजेते अमर्त्य सेन यांच्याकडे वाट्यापेक्षा जास्त जमीन असल्यानं त्यांनी त्यावरचा ताबा सोडून ती विश्वभारती विद्यापीठाला परत करावी, असं नोटिसमध्ये म्हटलं आहे.

Nobel laureate economist Amartya Sen. (File Photo)
Nobel laureate economist Amartya Sen. (File Photo) (HT_PRINT)

Amartya Sen Land Scam : जगविख्यात अर्थशास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांच्यावर कथित जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळं पश्चिम बंगालसह संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. अमर्त्य सेन यांच्याकडे त्यांच्या वाट्यापेक्षा जास्त जमीन असल्याचा आरोप करत विश्वभारती विद्यापीठाने त्यांना नोटीस जारी केली आहे. त्यामुळं आता या प्रकरणावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सेन यांनी त्याच्या ताब्यात असलेली जमीन तातडीनं विद्यापीठाला परत करावी, अशीही मागणी विश्वभारती विद्यापीठाकडून करण्यात आली आहे. अमर्त्य सेन हे सध्या अमेरिकेत असून विश्वभारती विद्यापीठाकडून त्यांना गेल्या काही दिवसांत दुसऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नोबेल विजेते अमर्त्य सेन यांच्या मालकीची पश्चिम बंगालमधील शांती निकेतन भागात जमीन आहे. त्यावर विश्वभारती विद्यापीठ प्रशासनानं आक्षेप घेतला आहे. अमर्त सेन यांना विद्यापीठानं नोटीस जारी करत येत्या २४ मार्चपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे. याशिवाय सेन यांनी २९ मार्चला विद्यापीठाच्या सह रजिस्ट्रार समोर हजर राहण्यासही नोटीसमध्ये बजावण्यात आलं आहे. अमर्त्य सेन हे काही वर्षांपूर्वी बंगालमध्ये अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत. त्यांचं कुटुंब देखील अमेरिकेतच आहे. त्यामुळं आता विश्वभारती विद्यापीठानं केलेल्या आरोपांनंतर अमर्त्य सेन कायदेशीर लढाईसाठी भारतात परतण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विश्वभारती विद्यापीठाचं म्हणणं काय?

शांती निकेतनमध्ये अमर्त्य सेन यांनी त्याच्या मालकीच्या जमीनीसह इतर जमीनीवरही ताबा केला आहे. शांती निकेतन भागात अमर्त्य सेन यांच्या नावावर १.२५ एकर जमीन आहे. परंतु त्यांच्या ताब्यात १.३८ एकर जमीन असल्याचा विद्यापीठ प्रशासनाचा आरोप आहे. त्यामुळं त्यांनी मालकीशिवाय उरलेली जमीन विश्वभारती विद्यापीठाला परत करावी. सेन हे जमीनीवरील ताबा सोडणार नसेल तर त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार असल्याचंही विश्वभारती विद्यापीठानं नोटिशीत म्हटलं आहे. या प्रकरणात सेन कुटुंबियांकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही.

IPL_Entry_Point