मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  काहीच सुरक्षित नाही.. तरुणांनी अशा वस्तुची केली चोरी ज्याची कोणी कल्पनाही नसेल केली, पाहा Video

काहीच सुरक्षित नाही.. तरुणांनी अशा वस्तुची केली चोरी ज्याची कोणी कल्पनाही नसेल केली, पाहा Video

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 06, 2023 07:15 PM IST

Viral video : चोरीचा हा व्हिडिओइंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही आपले हसू रोखू शकणार नाही.

व्हायरल व्हिडिओ
व्हायरल व्हिडिओ

सोने-चांदी, हिरे व पैशांची चोरी झाल्याचे आपण ऐकले असेलच. यापेक्षा काही लोक चारचाकी व दुचाकी गाड्या चोरतात. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एक व्हिडिओत दोन तरुणांनी अशी वस्तू चोरली ज्याची कोणी कल्पनाही केली नसले. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही आपले हसू रोखू शकणार नाही.

ट्रेंडिंग न्यूज

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत पाहू शकता की, दोन तरुण स्कुटरवरून येतात. त्यानंतर एक तरुण एका घराच्या गेटच्या आत येतो. त्यानंतर दुसऱ्याला इशारा करूनस्कूटीयोग्य जागी लावण्या सांगतो. त्यानंतर दुसरा तरुण स्कुटी घेऊन त्या जागी येतो. काही वेळाने एक तरुण खाली वाकतो व एका गटारीचे झाकण उघडतो. व्हिडिओ पाहून वाटते की, त्या गटारीच्या आत काहीतरी महागडी वस्तू असेल. मात्र असे काही नसते. हे दोन तरुण गटारीचे झाकणच चोरी करतात व स्कुटीवर लादून फरार होतात.

या झाकणाचे ते काय करणार आहेत, याची काहीच कल्पना नाही. इंस्टाग्रामचे यूजर्स हा व्हिडिओ पाहून लोटपोट हसत आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर indian.official.memes या पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे. बातमी लिहीपर्यंत हा व्हिडिओ ४० हजार लोकांनी पाहिला असून २ हजार लाईक्सही मिळाल्या आहेत. या व्हिडिओवर लोक गंमतीशीर कमेंटही करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग