मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  United Airlines: भयानक! युनायटेड एअरलाइन्सच्या दोन विमानांची टक्कर

United Airlines: भयानक! युनायटेड एअरलाइन्सच्या दोन विमानांची टक्कर

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 07, 2023 10:02 AM IST

United Airlines: अमेरिकेच्या बोस्टन लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावर युनायटेड एअरलाइन्सच्या दोन विमानांमध्ये टक्कर झाल्याची माहिती समोर आली आहे.

United Airlines
United Airlines

United Airlines News: अमेरिकेच्या बोस्टन लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावर युनायटेड एअरलाइन्सच्या दोन विमानांनी एकमेकांना टक्कर दिल्याची घटना घडली आहे. सीएनएनने फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशनचा हवाला देत यासंदर्भात माहिती दिली आहे. स्थानिक वेळेनुसार, ही घटना सोमवारी (६ मार्च २०२३) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एफएएने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, बोस्टन लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील युनायटेड एअरलाइन्स प्लाइट ५१५ च्या उजव्या विंगने सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या युनायटेड एअरलाइन्सच्या फ्लाइट २६७ पाठीमागून धडक दिली. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. हे दोन्ही विमान बोईंग ७३७ आहेत, जे उड्डाण भरणार होते.

या दोन्ही विमानातील प्रवाशांना दुपारी नियोजित दुसऱ्या विमानात बसवण्यात आले. मात्र, या घटनेनंतर प्रवासी घाबरले. या अपघातग्रस्त विमानातील एका प्रवाशाने हा अपघात खूप मोठा धक्का होता. दुसऱ्या प्रवाशाने सांगितले की, मी विमानात होते, तेव्हा अचानक झटका लागला. मी उजव्या बाजूला पाहिले असता एक विमान अपघातग्रस्त झाल्याचे दिसले. सर्व प्रवासी घाबरुन आरडोओरडा करू लागले. दरम्यान, अग्निशमन दल आणि पोलिसांची गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला. आम्ही ताबडतोब विमानातून खाली उतरलो.

IPL_Entry_Point

विभाग