मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Uttar Pradesh Encounter : उत्तर प्रदेशात पुन्हा मोठं एन्काऊंटर, पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन गुन्हेगार ठार

Uttar Pradesh Encounter : उत्तर प्रदेशात पुन्हा मोठं एन्काऊंटर, पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन गुन्हेगार ठार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 14, 2023 04:58 PM IST

Uttar Pradesh Crime News : असद अहमदच्या एन्काऊंटरची घटना ताजी असतानाच आता यूपीत पुन्हा एकदा एन्काऊंटर झाला आहे.

Uttar Pradesh Crime News
Uttar Pradesh Crime News (HT)

Uttar Pradesh Crime News : प्रयागराज येथील कुख्यात गुंड असद अहमद याचा एन्काऊंटर झाल्याची घटना ताजी असतानाच आता उत्तर प्रदेशातील जालौन येथे आणखी एक एन्काऊंटर झाल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी दोन दिवसांपूर्वीच भारतीय सैन्यातील जवानांची हत्या केली होती, त्यानंतर आता पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन्ही आरोपींचा खात्मा करण्यात आला आहे. त्यामुळं आता उत्तर प्रदेशात सातत्याने होत असलेल्या एन्काऊंटरचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उत्तर प्रदेशातील जालौन येथील महामार्गावर दोन आरोपींनी भारतीय सैन्यातील जवानाची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत आरोपींच्या अटकेची कार्यवाही सुरू केली होती. परंतु आरोपी फरार झाल्यामुळं पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी जालौन शहरातील कारखाना परिसरात आरोपी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना घेरून आत्मसमर्पण करण्याची मागणी केली. परंतु आरोपींनी आत्मसमर्पणास नकार देत पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कारखाना परिसरात पोलीस आणि आरोपींमध्ये चांगलीच धुमश्चक्री उडाली.

आरोपींनी गोळीबार करण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी देखील पलटवार केला. त्यात दोन्ही आरोपींना गोळ्या लागल्या आहे. गोळीबारात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून दुसऱ्या आरोपीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी प्रयागराज येथील कुख्यात गुंड असद अहमद आणि त्याचा साथीदार गुलाम यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार मारलं होतं. त्यानंतर आता जालौनमध्येही एन्काऊंटर झाल्याची घटना समोर आल्यामुळं उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे.

IPL_Entry_Point