Viral News On Social Media : शाळेतील परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेवर पास्ड लिहिण्याऐवजी 'पास्ड अवे' लिहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक शब्द चुकीचा लिहिण्यात आल्यामुळं विद्यार्थ्यासह त्याच्या पालकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेतील मालवी या देशातील एका शाळेत हा संतापजनक प्रकार घडला आहे. शाळेतील परिक्षा संपली त्यानंतर त्याचा निकालही लागला. विद्यार्थ्याला चांगले मार्क्स मिळालेले असल्यामुळं शिक्षकानं गुणपत्रिकेवर पास लिहिण्याऐवजी पास्ड अवे असं लिहिलं. त्यामुळं आता या प्रकरणावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित विद्यार्थ्याची वादग्रस्त गुणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतील मालवी या देशातल्या एका प्राथमिक शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. परिक्षा झाल्यानंतर शाळा प्रशासनानं विद्यार्थ्यांचा निकाल लावला. त्यावेळी एका विद्यार्थ्याला एकूण ८०० पैकी ५५२ गुण मिळाले. तो चांगल्या मार्कांनी पास झालेला होता. त्यामुळं गुणपत्रिकेवर पास असं लिहिण्याऐवजी शिक्षकानं पास्ड अवे असा उल्लेख केला. संबंधित विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असा त्याचा अर्थ होत असल्यामुळं शाळेतील विद्यार्थ्यांसह पालक आणि इतर शिक्षकांनी या प्रकरणावर आक्षेप घेतला. व्हायरल होत असलेली ही घटना २०१९ सालची आहे. परंतु विद्यार्थ्याची गुणपत्रिका सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावीच्या परिक्षा सुरू असताना सर्रास कॉपी होत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळं प्रशासनानं संबंधित परिक्षा केंद्रांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. याशिवाय निकाल लावण्यासाठी देखील शिक्षण खात्याला मोठ्या संसाधनांची गरज असते. अशा वेळी एका छोट्याशा चुकीमुळं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत असतं. त्यामुळं आता व्हायरल मार्कशिटबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
संबंधित बातम्या