Parineeti Chopra : अभिनेत्री परिणीती चोप्रा करणार आम आदमी पक्षाच्या ‘या’ डॅशिंग खासदाराशी लग्न?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Parineeti Chopra : अभिनेत्री परिणीती चोप्रा करणार आम आदमी पक्षाच्या ‘या’ डॅशिंग खासदाराशी लग्न?

Parineeti Chopra : अभिनेत्री परिणीती चोप्रा करणार आम आदमी पक्षाच्या ‘या’ डॅशिंग खासदाराशी लग्न?

Updated Mar 28, 2023 06:14 PM IST

Parineeti chopra and Raghav Chadha : अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच आम आदमी पक्षाच्या खासदाराशी लग्न करणार आहे.

Parineeti chopra and Raghav Chadha
Parineeti chopra and Raghav Chadha

Parineeti chopra and Raghav Chadha : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांच्या अफेअरच्या चर्चा बॉलिवूड आणि राजकीय वर्तुळात सुरू असतानाच या चर्चेला बळकटी देणारी माहिती समोर आली आहे. हे दोघेही लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. राघव चढ्ढा यांच्या एका सहकाऱ्यानं यास दुजोरा दिला आहे.

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजीव अरोरा (Sanjeev Arora) यांनी या जोडीचं अभिनंदन केलं आहे. संजीव अरोरा यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. ‘मी राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांचं सहचर्य भरपूर प्रेम आणि आनंदानं भरलेलं असो. खूप खूप अभिनंदन,’ असं अरोरा यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. एखाद्या जबाबदार व्यक्तीनं चोप्रा आणि चढ्ढा यांच्या अफेरवर जाहीरपणे बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे. अरोरा यांच्या ट्वीटमुळं चर्चेला उधाण आलं आहे.

राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा हे एकमेकांचे खूप जुने मित्र आहेत. यूकेमध्ये शिक्षण घेत असताना दोघांची ओळख झाली होती. नुकतीच दोघांच्या कुटुंबीयांचीही भेट झाली होती, असं सांगितलं जातं. दोघांचाही लवकरच साखरपुडा होणार असल्याची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा एकत्र आले होते. याशिवाय डिनरसाठीही ते एकत्र आलेले दिसले होते. तेव्हापासून त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. परिणीती लग्नासाठी कपडे डिझाईन करण्यासाठी आली होती का, असे अनेक प्रश्न सोशल मीडियातून उपस्थित केले जात होते.

राघव चढ्ढा यांना पत्रकारांनी परिणीती सोबतच्या नात्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, त्यांनी काहीही बोलणं टाळलं होतं. मला परिणीतीचे नाही तर राजकारणाचे प्रश्न विचारले जावेत, असं ते म्हणाले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर