मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  SBI Recruitment 2024 : एसबीआयमध्ये मॅनेजरसह विविध पदांसाठी भरती; आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात

SBI Recruitment 2024 : एसबीआयमध्ये मॅनेजरसह विविध पदांसाठी भरती; आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 13, 2024 06:04 PM IST

SBI SCO Recruitment 2024: बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

State Bank of India Recruitment
State Bank of India Recruitment

State Bank of India Jobs: बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या नोकरीसाठी इच्छुक असलेले उमेदवार आजपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. यासाठी उमेदवारांना एसबीआयची अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर भेट द्यावी लागेल. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

या भरतीअंतर्गत बँकेतील स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या १३१ पदे भरण्यात येणार आहेत. ज्यात व्यवस्थापक (क्रेडिट विश्लेषक)- ५० जागा, सहाय्यक व्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक)- २३ जागा, उपव्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक)- ५१ जागा, व्यवस्थापक (सुरक्षा विश्लेषक)- ०३ जागा, सहाय्यक महाव्यवस्थापक (ॲप्लिकेशन सुरक्षा)- ०३ जागा आणि सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागाराच्या एक जागेचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मार्च २०२४ आहे.

अर्ज फी

या भरतीसाठी सामान्य/इडब्लूएस/ ओबीसी श्रेणीतील उमेदवारांकडून ७५० रुपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे. तर, एसी/एसटी/ बीडब्लूबीडी उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

 

अर्ज करण्याची प्रक्रिया

- उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्यावी.

- मुख्यपृष्ठावरील भरतीच्या पर्यायावर क्लिक करा

- त्यानतंर अर्ज भरून सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

- पुढे अर्ज फी भरुन फॉर्म सबमिट करा

WhatsApp channel