मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ISRO Recruitment: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांसाठी भरती

ISRO Recruitment: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांसाठी भरती

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 11, 2024 05:38 PM IST

Indian Space Research Organisation Recruitment: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने विविध पदांसाठी अर्ज मागिवले आहेत.

Step-by-step guide to apply for ISRO Recruitment 2024
Step-by-step guide to apply for ISRO Recruitment 2024 (HT_PRINT)

ISRO Job 2024: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे. यामध्ये सायंटिस्ट/इंजिनीअर, टेक्निकल असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट, लायब्ररी असिस्टंट आणि टेक्निशियन या पदांचा समावेश आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

इस्रोच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, अर्ज प्रक्रियेला कालपासून (१० फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख १ मार्च २०२४ आहे. त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या भरतीअंतर्गत इस्त्रोने शास्त्रज्ञ/अभियंत्यांसाठी ५, तांत्रिक सहाय्यकांसाठी ५५, वैज्ञानिक सहाय्यकांसाठी ६, तंत्रज्ञ बी/ड्राफ्ट्समन बी साठी १४२, स्वयंपाकी- ४, हलके वाहन चालक -४, ग्रंथालय-१, फायरमन ए- ३  आणि अवजड वाहन चालक- २ पदांसाठी अर्ज मागिवले आहेत.

निवड प्रक्रिया

अर्ज प्रक्रियेनंतर, उमेदवारांची शैक्षणिक प्रक्रिया आणि इतर निकषांच्या आधारे स्क्रीनिंग प्रक्रिया आयोजित केली जाईल. पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी आमंत्रित केले जाईल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना कौशल्य चाचणी किंवा मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

आवश्यक कागदपत्रे

कागदपत्रांमध्ये JPG किंवा JPEG स्वरूपात अलीकडील रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो (५०- १०० केबी साइज) JPG किंवा JPEG स्वरूपात स्वाक्षरी (५०- १०० केबी साइज), पात्रता प्रमाणपत्र आणि एससी / एसटी / अपंगत्व / माजी सैनिक प्रमाणपत्र (लागू आहे) यांचा समावेश आहे.

  • सर्वप्रथम उमेदवारानी इस्त्रोच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
  • त्यानंतर रिक्रूटमेन्ट पर्यायावर क्लिक करावे आणि वरील कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्यावर क्लिक करावी. 
  • पुढे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची दिसेल, त्यावर क्लिक करावी.
  • आता युजर आयडी आणि पासवर्ड टाकून स्वत:ची नोंदणी करावी.
  • लॉगिन केल्यानंतर अर्जात आवश्यक असलेली सर्व माहिती भरावी.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क भरावे.- 
  •  भविष्यातील संदर्भासाठी पुष्टी पृष्ठ डाउनलोड करा आणि ठेवा.

अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवाराने इस्त्रोच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

 

IPL_Entry_Point