Jobs 2024: दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड म्हणजेच डीएसएसएसबी येथे मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रियेला ८ फेब्रुवारी २०२४ पासून सुरुवात झाली. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी dsssb.delhi.gov.in या अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
डीएसएसएसबीमध्ये मल्टी टास्किंग स्टाफच्या ५६७ जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ मार्च आहे. यानंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क म्हणून भरावे लागेल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग आणि माजी सैनिक प्रवर्गातील महिला उमेदवार आणि उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
काही विभागांच्या पदांसाठी वयोमर्यादा १८- २५ वर्षे आहे. तर, काहींसाठी १८- २७ वर्षे ठेवण्यात आली. ओबीसींना कमाल वयोमर्यादेत तीन वर्षांची आणि एसटी एससीला पाच वर्षांची सूट मिळेल.
१८ हजार- ५६ हजार ९०० रुपये
उमेदवारांना २ तासांच्या परीक्षेत २०० एमसीक्यू प्रकारचे प्रश्न विचारले जातील. ज्यात सामन्य ज्ञान, बुद्धिमता चाचणी, अंकगणित आणि संख्यात्मक गणित, हिंदी भाषेची चाचणी, इंग्रजी भाषा चाचणी (प्रत्येकी ४० गुण) असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केला जाईल.
संबंधित बातम्या