IDBI Recruitment: पदवीधरांना बँकेत नोकरीची संधी; आयडीबीआयमध्ये ‘या’ पदांसाठी भरती-idbi recruitment 2024 apply for 500 junior assistant manager posts from feb 12 ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  IDBI Recruitment: पदवीधरांना बँकेत नोकरीची संधी; आयडीबीआयमध्ये ‘या’ पदांसाठी भरती

IDBI Recruitment: पदवीधरांना बँकेत नोकरीची संधी; आयडीबीआयमध्ये ‘या’ पदांसाठी भरती

Feb 07, 2024 02:23 PM IST

IDBI Junior Assistant Manager Recruitment: आयडीबीआय बँकेत कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले.

IDBI Bank invites applications for 500 Junior Assistant Manager vacancies
IDBI Bank invites applications for 500 Junior Assistant Manager vacancies

IDBI Recruitment 2024: आयडीबीआय बँकेने कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या 500  रिक्त जागेवर अर्ज मागिवले आहेत. अर्ज प्रक्रियेला येत्या १२ फेब्रुवारी २०२४ पासून सुरूवात होणार आहे. तर, अर्ज भरण्याची अंतिम मुदत २६ फेब्रुवारी २०२४ आहे. इच्छुक उमेदवार www.idbibank.in येथे अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. परीक्षेची संभाव्य तारीख १७ मार्च २०२४ आहे. 

आयडीबीआयमध्ये कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या ५०० जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे. या पदांसाठी उमेदवारांचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे असावे.

शैक्षणिक पात्रता

 उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.

निवड प्रक्रिया

 निवड प्रक्रियेत ऑनलाइन चाचणी आणि त्यानंतर ऑनलाइन चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल. ऑनलाइन परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल.

अर्ज शुल्क

एससी / एसटी / पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क २०० रुपये आहे. तर, इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी १ हजार रुपये शुल्क आहे.

अर्ज कसा करायचा?

इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम  www.idbibank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

होमपेजवर करिअर लिंकवर क्लिक दिसेल, तिथे क्लिक करावे. 

जेएएम २०२४ भरती टॅब रजिस्टर अंतर्गत अर्ज लिंकवर क्लिक करा

पुढे अर्ज भरून अर्ज शुल्क भरा.

सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अर्ज करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी आयडीबीआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.