मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Wolf Man Mystery : जर्मनीच्या जंगलात दिसला लांडग्याच्या रुपातला आदिमानव; भयंकर दृश्य पाहताच गिर्यारोहक पळाले

Wolf Man Mystery : जर्मनीच्या जंगलात दिसला लांडग्याच्या रुपातला आदिमानव; भयंकर दृश्य पाहताच गिर्यारोहक पळाले

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 30, 2023 12:01 PM IST

Wolf Man Mystery Germany : लांडग्याच्या स्वरुपातला आदिमानव दिसून आल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. जंगलातील फोटो चांगलेच व्हायरल झाले आहे.

Wolf Man Mystery Viral Photos
Wolf Man Mystery Viral Photos (HT)

Wolf Man Mystery Viral Photos : भारतातील हिमालयाच्या पर्वतांमध्ये हिममानवाच्या पायांचे ढसे दिसल्याची घटना ताजी असतानाच आता जर्मनीच्या जंगलातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. मध्य जर्मनीच्या हार्ज पर्वतांच्या जंगलात लांडग्याच्या स्वरुपात एक आदिमानव दिसून आला आहे. पर्यटनासाठी गेलेल्या गिर्यारोहकांना आदिमानव दिसला असून त्यांनी त्याचा फोटो काढत सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे. त्यामुळं आता पुन्हा एकदा पर्वतीय प्रदेशांमध्ये आदिमानव राहत असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. जर्मनीतल्या गिर्यारोहकांनी व्हायरल आदिमानवाला वुल्फ मॅन असं नाव दिलं आहे. त्यामुळं आता युरोपातील देशांमध्ये पुन्हा एकदा याबाबतचं संशोधन सुरू होण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य जर्मनीतल्या हार्ज पर्वतरांगेत काही गिर्यारोहक पर्यटनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना दूरवर एक लांडग्याच्या स्वरुपात बसलेला आदिमानव दिसून आला. व्हायरल फोटोतला आदिमानव नग्न, विलक्षण केसाळ, जमिनीवर बसून मातीत खेळण्यात मग्न असल्याचं दिसून येत आहे. संबंधित आदिमानवाचा गेल्याच पाच वर्षांपासून हार्ज पर्वतांमध्ये वास्तव्य असल्याचं जर्मनीतल वृत्तपत्र द बिल्डने म्हटलं आहे.

गिर्यारोहक जीना वैस यांनी आदिमानवाचा (वुल्फ मॅन) फोटो काढला आहे. त्यामुळं पृथ्वीवर अद्यापही अनेक आदिमानव राहत असल्याच्या चर्चा जोर धरण्याची शक्यता आहे. आम्ही हार्ज पर्वतरांगेत गिर्यारोहन करत असताना आम्हाला लांडग्याच्या स्वरुपातला एक माणूस बसलेल्या अवस्थेत दिसला. त्याच्या हातात एक लाकडाची लांब काठी होती, असं गिर्यारोहक जीना वैस यांनी म्हटलं आहे.

आम्ही दहा मिनिटं आरडाओरड केली. त्याने आमच्याकडे पाहूनही तो वाळूत खेळण्यात व्यस्त होता, असं जीना वैस यांनी म्हटलं आहे. यापूर्वी अनेकदा युरोपातील जंगलात लांडग्याच्या पोशाखात दिसणारे अनेक आदिमानव पाहण्यात आलेले आहे. त्यानंतर गिर्यारोहकांनी आदिमानवाचे फोटो आणि त्यांच्या पायांचे ठसे घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी ज्या-ज्यावेळी आदिमानव किंवा हिममानव दिसल्याचा दावा करण्यात आला, त्यावेळी तेथील पुरातत्व खात्याकडून व्हायरल दाव्यांचं खंडन करण्यात आलेलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग