मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Parliament Special Session Live Updates : महिला आरक्षणावर आज राज्यसभेत होणार चर्चा

Parliament Special Session(ANI)

Parliament Special Session Live Updates : महिला आरक्षणावर आज राज्यसभेत होणार चर्चा

07:27 AM ISTSep 21, 2023 12:57 PM Atik Sikandar Shaikh
  • twitter
  • Share on Facebook

Parliament Special Session : लोकसभेत महिला आरक्षणावरील विधेयक विक्रमी मतांनी पास झालं आहे. त्यानंतर आजपासून या विधेयकावर राज्यसभेत चर्चा होणार आहे.

Thu, 21 Sep 202306:50 AM IST

महिला आरक्षण कायद्याची तातडीने अंमलबजावणी करा- खर्गे

महिला आरक्षणावरील विधेयक आज राज्यसभेत मांडण्यात आलं आहे. विधेयकावर चर्चा सुरू असून कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महिला आरक्षणावरील कायद्याची तातडीनं अंमलबजावणी करण्याची मागणी मोदी सरकारकडे केली आहे.

Thu, 21 Sep 202304:34 AM IST

चांद्रयान ३ च्या यशावर लोकसभेत होणार चर्चा

इस्त्रोच्या चांद्रयान ३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लँडिंग केली आहे. त्यामुळं भारताचं जगभरातून कौतुक होत आहे. याच विषयावर आज लोकसभेत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षांचे प्रमुख नेते सभागृहात चांद्रयान ३ वर चर्चा करणार आहे.

Thu, 21 Sep 202304:33 AM IST

बीजेडीकडून सर्व खासदारांना व्हीप जारी

महिला आरक्षणावरील विधेयक आज राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे. सभागृहात चर्चा झाल्यानंतर त्यावर मतदान घेतलं जाणार आहे. त्यासाठी एनडीएतील घटकपक्ष असलेल्या बिजू जनता दलाने राज्यसभेच्या खासदारांना व्हीप जारी केला आहे.

Thu, 21 Sep 202302:04 AM IST

महिला आरक्षणाची अंमलबजावणी कधीपासून?, मोदींचा प्लॅन काय?

महिला आरक्षणावरील विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यास येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. परंतु इतक्या लवकर जागा आरक्षित करून कायद्याची अंमलबजावणी होणार नसल्याचं सरकारच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आगामी २०२९ च्या निवडणुकीतच महिलांना ३३ टक्के जागांवर निवडणूक लढवता येणार आहे.

Thu, 21 Sep 202302:04 AM IST

महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत, कोण कुणाच्या बाजुने?

महिला आरक्षणावरील विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा होणार आहे. दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान राज्यसभेत यावर मतदान होणार आहे. वायएसआर आणि बिजेडी हे पक्ष आधीच एनडीएत सामील झालेले आहे. देशातील २६ प्रमुख विरोधी पक्ष इंडिया आघाडीत सामील झालेले आहे. त्यामुळं आता राज्यासभेत चर्चेदरम्यान कोण कुणासोबत?, हे दिसून येणार आहे.

Thu, 21 Sep 202302:02 AM IST

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर, राज्यसभेत आज होणार चर्चा

केंद्रातील मोदी सरकारने आणलेलं महिला आरक्षणावरील विधेयक मंगळवारी लोकसभेत विक्रमी मतांनी मंजूर झालं आहे. त्यानंतर आज हे विधेयक राज्यसभेत मांडलं जाणार आहे. सर्वपक्षीय खासदारांनी विधेयकाला पाठिंबा दिल्याने या बिलाला राज्यसभेत कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही.