मराठी बातम्या  /  Nation And-world  /  Pakistan Govt Threatened Former Prime Minister Imran Khan See Details

Imran Khan Pakistan : ‘विदेशात जा नाही तर फाशीसाठी तयार रहा’, पाकिस्तानी सरकारची इमरान यांना धमकी

Pakistan's former Prime Minister Imran Khan
Pakistan's former Prime Minister Imran Khan (REUTERS)
Atik Sikandar Shaikh • HT Marathi
May 18, 2023 06:41 PM IST

Imran Khan Pakistan : पाकिस्तानी सरकारने माजी पंतप्रधान इमरान खान यांना देशाबाहेर जाण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे.

Imran Khan Pakistan News : आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात पाकिस्तानी सैन्याने माजी पंतप्रधान इमरान खान यांना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने इमरान यांच्या जामीन मंजूर करत पाकिस्तानी सरकारला फटकारलं आहे. त्यानंतर आता इमरान खान यांच्या घराबाहेर पाकिस्तानी सरकारने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच विदेशात जा नाही तर फाशीसाठी तयार रहा, अशा शब्दांत इमरान खान यांना धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता पाकिस्तानसह जगभरात खळबळ उडाली आहे. त्यामुळं आता पंतप्रधान शाहबाझ शरीफ आणि इमरान खान यांचे समर्थक आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या घरात ६० ते ७० अतिरेकी लपल्याचा आरोप सरकारकडून करण्यात आला आहे. त्यामुळं इमरान यांच्या घराला पोलिसांनी वेढा घातला आहे. याशिवाय पीटीआय या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इमरान यांच्या घराबाहेर जमले आहे. त्यामुळं आता पाकिस्तानी सरकारकडून सातत्याने धमक्या येत असल्यामुळं इमरान खान कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. एका खटल्याची सुनावणी संपल्यानंतर इस्लामाबाद पोलिसांनी इमरान खान यांना कोर्टातून अटक केली होती. त्यानंतर घटनेच्या तीन दिवसांनंतर सुप्रीम कोर्टाने इमरान खान यांना सोडण्याचे आदेश देत सरकारला फटकारलं होतं.

निवडणूक आयोग तसेच पाकिस्तानी सरकारने येत्या ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे निवडणुका जवळ येत असतानाच सत्ताधारी पीएम शाहबाझ शरीफ आणि इमरान खान यांच्यात जोरदार वाद पेटला आहे. याशिवाय पाकिस्तानी सैन्याची भूमिका देखील संदिग्ध असल्यामुळं पाकिस्तानात पुढील काही दिवसात मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

WhatsApp channel