मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Tina Dabi IAS Controversy : जिल्हाधिकारी टीना डाबी सोशल मीडियावर ट्रोल, लोकांना बेघर केल्याने अनेकांचा संताप

Tina Dabi IAS Controversy : जिल्हाधिकारी टीना डाबी सोशल मीडियावर ट्रोल, लोकांना बेघर केल्याने अनेकांचा संताप

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 18, 2023 05:47 PM IST

Jaisalmer Collector Tina Dabi : जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.

Tina Dabi IAS Controversy
Tina Dabi IAS Controversy (HT)

Tina Dabi IAS Controversy : पाकिस्तानातून आलेल्या हिंदुंच्या झोपडपट्ट्यांवर बुलडोझर चालवण्याचे आदेश जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना डाबी यांनी काढले आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करत शेकडो विस्थापित हिंदुंच्या कच्च्या घरांवर बुलडोझर चालवला आहे. त्यामुळं आता टीना डाबी यांचा नवा निर्णय वादात सापडला असून त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. पाकिस्तानातून आलेल्या हिंदुंची घरं पाडण्याचे आदेश दिल्यामुळं अनेकांनी टीना डाबी यांच्यावर टीका केली आहे. कालपासून ट्वीटरवर टीना डाबी हे नाव ट्रेंड होत आहे.

गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानातील हिंदू मोठ्या संख्येने राजस्थानातील जैसलमेर येथे आश्रय घेत आहे. टीना डाबी या जैसलमेरच्या जिल्हाधिकारी असून त्यांनी पाकिस्तानातील मोबाईल कॉल्सवर बंदी घालत जैसलमेरमध्ये जॅमर लावण्याचे आदेश जारी केले आहे. तसेच सरकारी जमिनीवर बेकायदेशीर पद्धतीने राहणाऱ्या पाकिस्तानी हिंदुंच्या घरावर बुलडोझर चालवून त्यांना तिथून हटवण्याच्या कारवाईचे आदेशही टीना डाबी यांनी दिले आहे. त्यानंतर राजस्थान पोलिसांनी आतापर्यंत १५० हून जास्त घरांवर बुलडोझरने कारवाई केली आहे. त्यामुळं अनेकांचा निवारा गेला, विस्थापितांना उन्हातान्हात दिवस काढावे लागत असल्याने अनेकांनी टीना डाबी यांनी सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

टीना डाबी या २०१५ साली झालेल्या यूपीएससीच्या परिक्षेत भारतात पहिल्या आल्या होत्या. त्याचवर्षी यूपीएससीत दुसरा क्रमांकावर असलेल्या अतहर आमिर खान यांच्याशी टीना यांनी लग्न केलं होतं. परंतु काही दिवसांनी त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर टीन डाबी आणि मराठमोळ्या प्रदीप गावंडे यांनी गेल्यावर्षीच लग्नगाठ बांधली होती, खाजगी आयुष्यामुळं अनेकदा चर्चेत असणाऱ्या टीना डाबी यावेळी मात्र वादग्रस्त निर्णयामुळं चर्चेत आल्या आहे.

IPL_Entry_Point