मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ओटीटीवरील अश्लील कंटेटच्या तक्रारींबाबत मोदी सरकार गंभीर; अनुराग ठाकुरांचे कारवाईचे संकेत

ओटीटीवरील अश्लील कंटेटच्या तक्रारींबाबत मोदी सरकार गंभीर; अनुराग ठाकुरांचे कारवाईचे संकेत

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 19, 2023 10:51 PM IST

Anurag Thakur : ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वाढती अश्लिलतेच्या तक्रारींबाबत केंद्रातील मोदी सरकार गंभीर असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं आहे.

Anurag Thakur On OTT Obscene Content
Anurag Thakur On OTT Obscene Content (HT_PRINT)

Anurag Thakur On OTT Obscene Content : ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाढती अश्लिलता आणि असभ्य शिवीगाळ याबद्दल आलेल्या तक्रारींची केंद्रातील मोदी सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. सर्जनशीलतेच्या नावाखाली जर कोणी शिवीगाळ करत असेल तर ते सहन केले जाणार नाही. आवश्यकता पडल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं आहे. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी ओटीटीवरील कंटेंटबाबत केंद्रातील मोदी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाढती शिवीगाळ आणि अश्लील दृश्यांविषयी येणाऱ्या तक्रारींबद्दल सरकार गंभीर आहे. जर यासाठी नियमात काही बदल करण्याची गरज भासली तर मंत्रालय त्या दिशेनेही विचार करेल. ओटीटी प्लॅटफॉर्म्सना सर्जनशीलतेसाठी स्वातंत्र्य देण्यात आले होते, शिवीगाळ आणि अश्लिलतेसाठी नाही. जर कोणी ही मर्यादा ओलांडत असेल तर दोषींविरोधात सरकार कारवाई करण्यास मागे हटणार नाही, असं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे.

ओटीटीवरील सध्याच्या प्रक्रियेनुसार आधी प्राथमिक पातळीवर निर्मात्यांना तक्रारींचे निवारण करावं लागतं. त्यांच्या वर्तनात बदल करुन ते ९० ते ९५ टक्के तक्रारी दूर करु शकतात. त्यानंतर संघटनेच्या पातळीवर देखील या तक्रारींचे निवारण केले जाते, जास्तीत जास्त तक्रारी तिथेच निरस्त केल्या जातात. त्यानंतर जेव्हा सरकारच्या पातळीवर गोष्टी होतात, तेव्हा विभागीय समितीच्या पातळीवर त्यात कठोर कारवाईचे जे नियम आहेत, त्यानुसार आम्ही कारवाई करतो. मात्र गेल्या काही काळापासून या तक्रारी वाढण्यास सुरुवात झाली आहे. आमचा विभाग अत्यंत गांभीर्याने त्याकडे बघतो आहे. आम्हाला या नियमावलीत बदल करायचं असेल, तर त्याबद्दलही आम्ही गांभीर्याने विचार करत असल्याचंही ठाकूर म्हणालेत.

IPL_Entry_Point