RR vs RCB Eliminator : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने आयपीएल २०२४ मध्ये चमकदार कामगिरी केली. त्याने साखळी फेरीतील १४ सामन्यांमध्ये ५०४ धावा केल्या. यात ५ अर्धशतकांचा समावेश आहे. संजूची टीम आयपीएल २०२४ च्या प्ले ऑफमध्ये पोहोचली आहे.
आता एलिमिनेटरमध्ये त्यांचा सामना (२२ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. या सामन्यापूर्वी संजूशी संबंधित एक रंजक खुलासा समोर आला आहे. या हंगामापूर्वीच त्याने आपला मोबाईल नंबर बदलला होता. फक्त काही लोकांकडे त्याचा नवीन नंबर आहे.
संजूचे बालपणीचे प्रशिक्षक बिजू जॉर्ज यांनी त्याच्याशी संबंधित एक रोचक खुलासा केला आहे. एका प्रतिष्ठित चॅनेलच्या बातमीनुसार, सॅमसनच्या बालपणीच्या प्रशिक्षकाने सांगितले की, “या सीझनपूर्वी त्याने आपला फोन नंबर बदलला होता. तो त्याचा जुना नंबर वापरत नाही. त्याचा नवा नंबर फक्त काही जवळच्या लोकांकडे आहे. त्याला त्याचे लक्ष विचलित होऊ द्यायचे नव्हते. त्याचे संपूर्ण लक्ष खेळावर आहे. आजकाल तो त्याच्या जवळच्या लोकांशिवाय कोणाशीही बोलत नव्हता.
संजू सॅमसनने खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वतःला सर्वांपासून दूर केले होते. तो पूर्णपणे फलंदाजीवर लक्ष केंद्रित करत होता. जर आपण आयपीएल २०२४ मधील सॅमसनची कामगिरी पाहिली तर ती आश्चर्यकारक आहे. त्याच्या कामगिरीसोबतच संघानेही अप्रतिम खेळ दाखवला आहे.
आयपीएल २०२४ च्या पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने १४ सामने खेळले आणि ८ जिंकले. सॅमसनने या मोसमात १४ सामन्यात ५०४ धावा केल्या आणि ५ अर्धशतके केली.
राजस्थानचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर बंगळुरू चौथ्या स्थानावर आहे. आता बुधवारी संध्याकाळी एलिमिनेटर सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने येतील. हा सामना जिंकणारा संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश करेल. पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल.
संबंधित बातम्या