Shah Rukh Khan : केकेआरच्या मालकानं हात जोडून माफी मागितली, शाहरूखनं असं का केलं? जाणून घ्या-shah rukh khan apologises with folded hands after kkr reached ipl 2024 final by defeating srh watch ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Shah Rukh Khan : केकेआरच्या मालकानं हात जोडून माफी मागितली, शाहरूखनं असं का केलं? जाणून घ्या

Shah Rukh Khan : केकेआरच्या मालकानं हात जोडून माफी मागितली, शाहरूखनं असं का केलं? जाणून घ्या

May 22, 2024 08:18 PM IST

Shah Rukh Khan Apologises With Folded Hands : कोलकात्याच्या फायनलमध्ये पोहोचल्यानंतर शाहरुख खानने हात जोडून का मागितली माफी? व्हिडिओमध्ये कारण जाणून घ्या

Shah Rukh Khan Apologises With Folded Hands : केकेआरच्या मालकानं हात जोडून माफी मागितली, शाहरूखनं असं का केलं, जाणून घ्या
Shah Rukh Khan Apologises With Folded Hands : केकेआरच्या मालकानं हात जोडून माफी मागितली, शाहरूखनं असं का केलं, जाणून घ्या

Shah Rukh Khan Apologises With Folded Hands : कोलकाता नाइट रायडर्स हा आयपीएल २०२४ च्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाताने पहिल्या क्वालिफायरमध्ये सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर केकेआर आणि हैदराबाद यांच्यात सामना झाला.

सामन्यात KKR च्या विजयानंतर, संघाचा सहमालक शाहरुख खानने हात जोडून माफी मागितली, या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वास्तविक, सामना संपल्यानंतर शाहरुख खान, त्याची मुलगी सुहाना खान आणि मुलगा अबराम खान यांनी मैदानात फिरून चाहत्यांचे आभार मानले. या दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा, पार्थिव पटेल आणि सुरेश रैना हे मैदानावर सामना संपल्यानंतरचा लाईव्ह शो करत होते. या शोच्या मधात शाहरुख खान चुकून आला. 

शाहरूख चाहत्यांना अभिवादन करण्याच्या नादात होता, अशा स्थितीत त्याला आपण शोच्या मधात आलो आहोत, हे कळले नाही. पण यानंतर ही गोष्ट त्याच्या लक्षात येताच त्याने सर्वांची माफी मागितली.

यानंतर शाहरुखने शो करत असलेल्या तिन्ही क्रिकेटर्सना मिठी मारली आणि निघताना पुन्हा एकदा हात जोडून सॉरी म्हटले. यानंतर आकाश चोप्राने सांगितले की, शाहरुख चुकून मधात आला होता, पण त्याने माफी मागितलीही. पण आम्ही त्याला सांगितले की तू आमचा दिवस बनवला आहेस. शाहरुखची ही शैली चाहत्यांना खूप आवडली. 

या व्हायरल व्हिडिओला उत्तर देताना आकाश चोप्राने इंस्टाग्रामवर लिहिले की, "तो साहजिकच एक दिग्गज आहे. खूप प्रेम आणि आदर आहे."

सामन्यात काय घडलं?

नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, पण त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला कारण संघ १९.३ षटकात १५९ धावांवर सर्वबाद झाला. संघासाठी सर्वात मोठी खेळी राहुल त्रिपाठीने खेळली. त्याने ३५ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५५ धावा केल्या. तर संघाचे एकूण ४ फलंदाज शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले.

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने अवघ्या १३.४ षटकांत विजय मिळवला. संघासाठी, कर्णधार श्रेयस अय्यरने २४ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ५८ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. याशिवाय व्यंकटेश अय्यरने २८ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ५१* धावा केल्या.

Whats_app_banner