SRH vs KKR Qualifier 1 : कॅप्टन कमिन्समुळे सामना गमावला, हैदराबादच्या पराभवाची ३ सर्वात मोठी कारणं, पाहा
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  SRH vs KKR Qualifier 1 : कॅप्टन कमिन्समुळे सामना गमावला, हैदराबादच्या पराभवाची ३ सर्वात मोठी कारणं, पाहा

SRH vs KKR Qualifier 1 : कॅप्टन कमिन्समुळे सामना गमावला, हैदराबादच्या पराभवाची ३ सर्वात मोठी कारणं, पाहा

SRH vs KKR Qualifier 1 : कॅप्टन कमिन्समुळे सामना गमावला, हैदराबादच्या पराभवाची ३ सर्वात मोठी कारणं, पाहा

Published May 22, 2024 11:12 AM IST
  • twitter
  • twitter
  • SRH vs KKR, IPL 2024 Qualifier 1 : आयपीएल २०२४ च्या क्वालिफायर वनमध्ये (२१ मे) कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. SRH च्या या एकतर्फी पराभवाची सर्वात मोठी कारणे कोणती आहेत. ते येथे जाणून घेऊया.
आयपीएल २०२४ च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना झाला. या विजयासह KKR फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. हैदराबाद हाच संघ आहे ज्याने चालू हंगामात २८७ धावा करून खळबळ उडवून दिली होती.
twitterfacebook
share
(1 / 10)

(IPL-X)
तसेच. आयपीएल २०२४ मध्ये SRH अद्याप ऑलआऊट झाला नव्हता, परंतु कोलकाताने त्यांना केवळ १५९ धावांवर गारद केले. क्वालिफायर सामन्यात ३ कारणांमुळे हैदराबादला पराभवाला सामोरे जावे लागले.
twitterfacebook
share
(2 / 10)

१) टॉप ऑर्डर सपशेल अपयशी ठरली-  सनरायझर्स हैदराबादचे सलामीचे फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या जोडीने आतापर्यंत गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते. या जोडीने यंदा अनेकदा ६ षटकांतच १०० धावांचा टप्पा ओलांडला होता. हैदराबादला मोठी धावसंख्या गाठण्यासाठी अभिषेक आणि हेडला खेळणे आवश्यक होते.
twitterfacebook
share
(3 / 10)

(ANI)
क्वालिफायर सामन्यात, हेड त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर शून्य धावांवर बाद झाला. दुसरीकडे, अभिषेकला ४ चेंडूत ३ धावा करता आल्या. हेडने यंदा ५३३ तर अभिषेकने ४७० धावा केल्या आहेत. पण संघाला त्यांची सर्वाधिक गरज असताना सलामीचे दोन्ही फलंदाज जबाबदारी उचलू शकले नाहीत.
twitterfacebook
share
(4 / 10)

(KKR - X)
२) हैदराबादकडे फक्त अटॅक, प्लॅन बी नाही- आतापर्यंत, हैदराबाद त्यांच्या आक्रमक खेळामुळे आयपीएल २०२४ मध्ये विरोधी संघांवर वर्चस्व गाजवत होता. मात्र क्वालिफायरसारख्या महत्त्वाच्या सामन्यात खेळाडूंनी जबाबदारीने खेळण्याची गरज होती. विशेषतः शाहबाज अहमद आणि नितीश रेड्डी हे खूपच बचावात्मक झाले होते. 
twitterfacebook
share
(5 / 10)

(PTI)
एकवेळ संघाच्या ६ विकेट पडल्या होत्या, तेव्हा पॅट कमिन्स आणि अब्दुल समद क्रीझवर उभे होते. समद चांगला खेळत आणि त्याच्यानंतर कोणताही नियमित फलंदाज नव्हता त्यामुळे त्याने कमिन्सला साथ देण्यासाठी शेवटपर्यंत क्रीजवर राहणे आवश्यक होते. 
twitterfacebook
share
(6 / 10)

पण समदने गडबड केली आणि तो झेलबाद झाला. समद बाद झाला तेव्हा डावात ५ पेक्षा जास्त षटके शिल्लक होती. कर्णधार कमिन्स शेवटच्या षटकापर्यंत खंबीर राहिला आणि त्याने ३० धावा केल्या, पण समदने त्याला साथ दिली असती तर SRH १५९ ऐवजी १८० धावांपर्यंत पोहोचू शकला असता.
twitterfacebook
share
(7 / 10)

३) कमकुवत प्लेइंग इलेव्हनची निवड-  आतापर्यंत पॅट कमिन्सने धाडसी निर्णय घेत सनरायझर्स हैदराबादच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले होते. पण केकेआरविरुद्धच्या सामन्यात त्याने मोठी चूक केली. एसआरएचच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नियमित फिरकी गोलंदाज नव्हता, त्यामुळे संघ पूर्णपणे वेगवान गोलंदाजीवर अवलंबून होता. 
twitterfacebook
share
(8 / 10)

यामुळे ट्रॅव्हिस हेडलाही गोलंदाजी करावी लागली, ज्याने १० चेंडूत ३२ धावा दिल्या. कमिन्सने इम्पॅक्ट प्लेयरची निवडही अत्यंत खराब केली. हैदराबाद फलंदाजीत संघर्ष करत असताना सनवीर सिंगला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवण्यात आले.
twitterfacebook
share
(9 / 10)

पण सनवीर पहिल्याच चेंडूवर बाद झाला. सनवीरपेक्षा ग्लेन फिलिप्स, मार्करम किंवा वॉशिंग्टन सुंदर हे चांगले पर्याय असू शकले असते. या फलंदाजांकडे दबावाच्या परिस्थितीत फलंदाजीचा अनुभव आहे आणि मोठे फटके मारण्याची क्षमताही आहे.
twitterfacebook
share
(10 / 10)

इतर गॅलरीज